लवकर बरे व्हा! आरजीचा विश्वजीत राणेंवर पलटवार

फेसबूवर व्हिडीओ शेअर करत निशाण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : मनोज परब कोण, मला माहीत नाही? असं वक्तव्य करणाऱ्या आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंवर रिव्हॉल्यूशनरी गोवन्सने पलटवार केलाय. लवकरच बरे व्हा, असा खोचक टोला लगावत एक व्हिडीओ आरजी संघटनेनं आपल्या फेसबूक पेजवर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये विश्वजीत राणे हे आरजी संघटनेवर घणाघाती टीका करत असल्याचं पाहायला मिळतंय. रिव्हॉल्यूशनरी गोवन्स संघटनेवर टीका करतानाच त्यांनी ‘उजो’वरुनही टोला लगावला होता.

Manoj Parab

विश्वजीत राणे यांना गोवन वार्ता लाईव्हच्या प्रतिनिधींनी पालिका निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी आरजीच्या प्रचाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी विश्वजीत राणे यांनी मनोज परब कोण हे मला माहीत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन आरजीनं निशाणा साधत विश्वजीत राणेंवर पलटवार केलाय. नेमकं या व्हिडीओतून विश्वजीत राणेंबाबत काय टोलेबाजी करण्यात आली आहे, ते तुम्हीच पाहा..

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!