लस घ्या, स्वतःला सुरक्षित करा

सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्यांचं आवाहन; मणिपाल हॉस्पिटलमध्ये घेतला कोविड - १९ लसीचा पहिला डोस

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कोविड -१९ विरुद्धाच्या जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आपल्या भारतीय डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी खूप कमी काळात लस निर्मितीसाठी केलेले प्रयत्न आणि कार्य उल्लेखनीय आहे. भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज देशातील प्रत्येक नागरिक कोविड-१९ विरुद्धात लढा देण्यास विविध माध्यमातून पुढे येत आहे. गोवा राज्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली लसीकरण मोहिमेचा उपक्रम स्तुत्य असून भारतदेश, गोवाराज्य कोविड -१९ महामारी पासून मुक्त करण्यासाठी लस घेण्यास पात्र असलेल्या आपण देशवासियांनो लस घ्या, स्वतःला सुरक्षित करा, असं आवाहन श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर तथा आध्यात्मिक धर्मगुरुधर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केलं आहे.

हेही वाचाः आधी पेडेणेतील सर्व्हिस रस्ते करा, नंतर राष्ट्रीय महामार्गाचं काम हाती घ्या

शनिवारी २६ जून रोजी पणजीतील मणिपाल हॉस्पिटल येथे पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी आणि सत्गुरु फाउंडेशन अध्यक्ष अँड. ब्राह्मीदेवीजींनी कोविड -१९ लसचा पहिला डोस घेतला. याप्रसंगी पूज्य स्वामीजींनी देशवासियांना आवाहन केलं आहे.

हेही वाचाः लसीकरणानेच कोरोनावर मात करणं शक्य

यावेळी मणिपाल हॉस्पिटलचे डॉ. शेखर साळकर, डॉ. पूजा नावेलकर, डॉ. गौरंग शिरोडकर, डॉ. अशी मडकईकर उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!