मांद्रे आयसोलेशन सेंटरमध्ये मोफत कोरोना टेस्ट करून घ्या

जीत आरोलकरांचं मांद्रेवासीयांना आवाहन; मांद्रे उदरगततर्फे मोफत कोरोना टेस्ट उपक्रमाचा शुभारंभ

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः मांद्रे मतदार संघातील किनारपट्टी भागातील नागरिकांनी मांद्रे उदरत संस्थेमार्फत मांद्रे आयसोलेशन सेंटरमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोरोना टेस्ट उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपापली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन मगोप नेते जीत आरोलकर यांनी केलं. मांद्रे उदरगततर्फे आश्वे- मांद्रे येथे आयसोलेशन सेंटरमध्ये नागरिकांसाठी मोफत कोरोना टेस्ट उपक्रमाचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

40 पैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

पहिल्याच दिवशी एकूण 40 नागरिकांनी स्वतःची कोरोना टेस्ट केली. त्यापैकी सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या सात जणांना आयसोलेशन सेंटरमध्ये लगेच दाखल करून घेण्यात आलं आणि तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

हेही वाचाः सुरुवातीला लॉकडाऊन केला असता, तर आज राज्याचं चित्र वेगळं असतं

मांद्रे मतदारसंघातील नागरिकांची मोफत तपासणी

सध्या तुये हॉस्पिटलमध्ये नागरिकांना कोरोना टेस्ट करण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतंय. तिथे वेळही वाया जातो. काही जण खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना टेस्ट करतात. तिथे त्यांना 600 ते 1000 रुपये खर्च करावे लागतात. मांद्रे मतदारसंघातील नागरिकांसाठी मांद्रे उदरगत संस्थेमार्फत ही सोय मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे, असं आरोलकर म्हणाले.

प्रत्येक पंचायतीत कोरोना टेस्टची सोय करण्याची तयारी

कोरोना टेस्टची सोय प्रत्येक पंचायतीत करण्याची माझी तयारी आहे. त्या त्या पंचायतीने पुढे येऊन ही जबाबदारी घ्यावी. मी त्या पंचायतीत टेस्टसाठी लागणारी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देईन, असा विश्वास आरोलकांनी दिला.

हेही वाचाः डॉ. प्रमोद सावंत सरकार बरखास्त करा

नागरिकांनी लाभ घ्यावा

मांद्रे उदरगत संस्था कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करत आहे. मांद्रे मतदारसंघात सर्वप्रथम आयझोलेशन सेंटर मांद्रेत कार्यरत केलंय. या ठिकाणी 20 पेक्षा जास्त नागरिक उपचार घेऊ शकतात. इथे मोफत जेवण, राहण्याची सोय, नियमित वैदकीय तपासणी, औषधं, पाणी अशी सोय केली आहे. सुसज्ज वीस खोल्यांचं हॉटेल भाडेपट्टीवर घेऊन ही सोय केली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन आरोलकरांनी केलं. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!