जीईडीसीकडून व्याजमुक्त कर्ज योजना जाहीर

१४ जानेवारी २०२२ अर्ज करण्याची अंतिम तारीख

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: गोवा शिक्षण विकास महामंडळाने (जीईडीसी) २०२१-२२ या वर्षासाठी व्याजमुक्त कर्ज योजना जाहीर केली आहे. योजनेचे अर्ज ६ सप्टेंबरपासून महामंडळाकडे तसेच https://gedc-goa.org या संकेतस्थळावर उपलब्ध असतील, अशी माहिती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुही रेडकर यांनी दिली आहे.

२३ सप्टेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी २३ सप्टेंबरपासून अर्जासह आवश्यक कागदपत्रे महामंडळाकडे सकाळी १० ते सायंकाळी ४ या कार्यालयीन वेळेत सादर करावे.

१४ जानेवारी २०२२ अर्ज करण्याची अंतिम तारीख

अर्ज सादर करण्यासाठी अखेरची तारीख १४ जानेवारी २०२२ आहे, असेही रेडकर यांनी जारी केलेल्या नोटिशीत म्हटलं आहे.

हा व्हिडिओ पहाः कामाची बातमी | PF Account | तुम्ही PF अकाऊंड होल्डर आहात? मग हे बघाच

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!