जीसीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

फिजिक्समध्ये आदित्य भट्ट, केमिस्ट्रीत सर्वराज घोसवाळकर प्रथम

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: अभियांत्रिकी आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या जीसीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. फिजिक्स विषयात आदित्य भट्ट, केमिस्ट्री विषयात सर्वराज घोसवाळकर यांनी सर्वाधिक गुण प्राप्त केले. गणित विषयात चार विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण प्राप्त केले आहेत.

हेही वाचाः ‘अभिनव कला मंदिर’चा गुरुपौर्णिमा कार्यक्रम

मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर

तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे संचालक विवेक कामत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी परीक्षा समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. एन. शेट आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. अभियांत्रिकी आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रमाचा प्रवेश जीसीईटी परीक्षेच्या गुणांवर होईल. सविस्तर निकाल तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी फिजिक्स आणि गणित या विषयांतील गुणांचा विचार होतो. फार्मसी प्रवेशासाठी फिजिक्स आणि केमेस्ट्री या विषयांचा विचार होतो. ही परीक्षा २९ आणि ३० जुलै रोजी १६ केंद्रांमध्ये झाली होती.

हेही वाचाः त्रास देणं हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा होत नाही

२,१३५ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

२,१३५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. फिजिक्स विषयात आदित्य भट्ट याला सर्वाधिक ६९ गुण मिळाले. फिजिक्स विषयांत सरासरी २१.७४ गुण मिळाले आहेत. केमिस्ट्री विषयात सर्वराज घोसाळकर याला सर्वाधिक ७० गुण मिळाले. या विषयात सरासरी २४.८६ गुण विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. गणित विषयात चार विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळाले आहेत. स्वस्तिक वालावलकर, जोशुआ बार्रेटो, सर्वराज घोसाळकर आणि मनाली मांजरेकर यांना ७५ पैकी ७३ गुण मिळाले आहेत.

हेही वाचाः RAIN UPDATE | पावसाने गाठली नव्वदी

२५ ऑक्टोबरपूर्वी अभियांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी

वैद्यकीय, होमिओपॅथी, आयुर्वेदिक अभ्यासक्रमांचा प्रवेश नीट परीक्षेच्या गुणांवरून केला जातो. ही परीक्षा व्हायची आहे. अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशासाठी तांत्रिक शिक्षण संचालनालय अर्ज घेऊन ठेवेल. नीट परीक्षा झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, २५ ऑक्टोबरपूर्वी अभियांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, अशी अट अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने घातली आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Crime | Viral | कॅब ड्रायव्हरला का केली तरुणीनं मारहाण?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!