जीसीईटी परीक्षा 27, 28 जुलै रोजी

तांत्रिक शिक्षण संचालनालयाची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेशासाठीची गोवा समान प्रवेश परीक्षा (जीसीईटी) 15 आणि 16 जून रोजी होणार होती. आता ही परीक्षा पुढे पुढे ढकलण्यात आली आहे. तांत्रिक शिक्षण संचालनालयाने परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहे.

हेही वाचाः प्रशासकीय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने जारी केलं परिपत्रक

काय आहे नवीन तारखा?

तांत्रिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार जीसीईटीची परीक्षा आता 27 आणि 28 जुलै 2021 रोजी होतील. पण तरीही याबाबतच्या निश्चित तारखा दहा दिवस अगोदर जाहीर करणार असल्याचं तांत्रिक शिक्षण संचालनालयाने म्हटलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांना बेवसाईट चेक करत राहण्याचं तांत्रिक शिक्षण संचालनालयाने आवाहन केलंय.

कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलली

ही परीक्षा मे महिन्यात होणार होती. करोनामुळे बारावीची वार्षिक परीक्षा लांबणीवर पडली, त्यामुळे ही परीक्षाही पुढे ढकलावी लागली. अजूनही राज्याचील कोरोनाची स्थिती पाहता या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचाः विद्यापीठ, कॉलेज शिक्षकांना कामावर रुजू होण्याचे निर्देश

परीक्षेसाठी अर्जाबाबतची प्रक्रिया 20 जूनपासून डीटीई वेबसाईटवर उपलब्ध असेल, असं तांत्रिक शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या सूचनेत म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!