जीसीईटी परीक्षा १५, १६ जून रोजी

तांत्रिक शिक्षण संचालनालयाकडून परीक्षेच्या तारखा जाहीर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेशासाठीची गोवा समान प्रवेश परीक्षा (जीसीईटी) १५ आणि १६ जून रोजी होणार आहे. तांत्रिक शिक्षण संचालनालयाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहे.

कोरोनामुळे परीक्षा ढकलली पुढे

ही परीक्षा मे महिन्यात होणार होती. करोनामुळे बारावीची वार्षिक परीक्षा लांबणीवर पडली, त्यामुळे ही परीक्षाही पुढे ढकलावी लागली. १५ रोजी सकाळी १० वा. भौतिकशास्त्र, दुपारी २ वा. रसायनशास्त्र पेपर होईल. १६ रोजी गणिताचा पेपर होईल. परीक्षा तसेच प्रवेशासाठीची माहितीपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परीक्षेसाठी अर्ज देण्याच्या तारखा तसंच अन्य माहिती १० मेपर्यंत जाहीर केली जाईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!