गवंडाळीत रेल्वे ओव्हरब्रीज पाहिजेच; लोकांची आग्रही मागणी

दर दिवशी या मार्गाने हजारो गाड्यांची ये-जा; क्रॉसिंगमध्ये अडकतात रुग्णावाहिका

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजीः कुंभारजुवा-गवंडाळी रेल्वे क्रॉसिंगकडे ओव्हरब्रीज अत्यंत आवश्यक असल्याची मागणी या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचाः काँग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवणार

ओव्हरब्रीजशिवाय पर्याय नाही

हल्लीच काही वर्षांपूर्वीच झालेल्या गवंडाळी पुलामुळे या रस्त्याने होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलीये. साखळी, वाळपई, माशेल, होंडा या शहरांमधून राजधानी पणजीत मोठ्या प्रमाणात लोक दर दिवशी ये-जा करत असतात. मात्र काही ठरावीक वेळेच्या अतरानंतर रेल्वे क्रॉसिंग गेट पडत असल्याने लोकांचा मोठा खोळंबा होतो. भविष्याच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास या ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रीजशिवाय पर्याय नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे. महत्त्वाचा म्हणजे खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेदेखील याच मार्गाने साखळीहून राजधानी पणजीत येत असतात. कित्येकदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही या रेल्वे क्राँसिंगमध्ये अडकून पडले आहेत.

हेही वाचाः गोव्यात विवाहानंतरच्या हिंसेचे प्रमाण आठ टक्के

रुग्णांना बांबोळीत नेणाऱ्या रुग्णवाहिका अडकून पडतात

या रस्त्यामुळे राजधानी पणजीत जाण्याचं अंतर कित्येक किलोमीटरांनी कमी होतं. गवंडाळीचा पूल अस्तित्वात येण्यापूर्वी वाळपई, साखळी, माशेल आणि इतर भागातील लोक मार्शेल – तिवरे- बाणस्तारीमार्गे पणजी राजधानीत दाखल होत असत. मात्र आता या अंतर कापणारा पर्यायी रस्त्याची सोय झाल्याने सर्वजण याच मार्गाचा अवलंब करतात. मुख्य म्हणजे साखळी, वाळपई या ठिकाणांवरील सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमधील इमर्जन्सी रुग्णांना नेणाऱ्या रुग्णवाहिका याच मार्गाने बांबोळी गाठतात. मात्र कित्येकदा रेल्वे क्रॉसिंगची गेट पडल्यानं या रुग्णवाहिका अडकून पडतात. ओव्हरब्रीज झाल्यास ही गैरसोय दूर होईल यात शंका नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!