अखेर मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला

२३ स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या.

किशोर नाईक गावकर | प्रतिनिधी

पणजीः सरकारने स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांवर अन्याय केल्याचं कारण पुढे करून स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं. स्वातंत्र्यसैनिकांनीही यात सहभाग घेतला होता. विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपली पोळीही भाजून घेतली होती. सरकारने मात्र आंदोलकांचे प्रश्न एकून घेऊन त्यावर तात्काळ उपाय काढला आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठी राखीव असलेल्या सरकारी नोकऱ्यांचा विषय निकालात काढला. या योजनेंतर्गत 23 स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नेमणूकपत्रं पाठविण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. वास्तविक ही नेमणूकपत्रे वितरीत करण्यासाठी मंगळवार 11 मे रोजी एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कोविडमुळे हा कार्यक्रम रद्द करून थेट नियुक्तीपत्रं पाठविण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेत.

हेही वाचाः 2 हजार लोकप्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून अनोखी भेट

राज्य सरकारच्या वेगवेगळ्या 11 खात्यांत 23 पदांसाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांची शिफारस करण्यात आलीए. या उमेदवारांना काही अटींबाबत शिथिलता देण्यासंबंधी यापूर्वीच मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. आता नव्याने या नावांची शिफारस करण्यात आलीए. ही नियुक्तीपत्रे संबंधीत उमेदवारांना पाठविण्यात यावीत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. वास्तविक 31 मार्च 2021 पर्यंत हा विषय निकालात काढला जाईल, असं आश्वासन सरकारनं दिलंय. यानंतर या संपूर्ण विषयाचा आढावा घेऊन आणि त्यासंबंधी आवश्यक सुधारणा करून अखेर सरकारने हा विषय निकालात काढलाय. गोवा मुक्तीच्या 60 व्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारकडून ही स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांसाठी दिलेली अनोखी भेट ठरली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!