सिलिंडर पुन्हा एकदा २५ रुपयांनी महागला, किंमत ८००च्या पार

घरगुती सिलिंडर दरात पुन्हा २५ रुपयांची वाढ

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा २५ रुपयांनी वाढ झाली आहे. चार दिवसांपूर्वीच २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता १४.२ किलो घरगुती गॅस सिलेंडरसाठी दिल्लीत ८१९ रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन दर सोमवारपासूनच लागू झाले आहेत.

कधी कशी वाढ?

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांत याआधी २५ फेब्रुवारी रोजी २५ रुपयांनी वाढ झाली होती. त्या आधी ४ फेब्रुवारीला २५ रुपयांची वाढ झाली होती, तर १४ फेब्रुवारीला ५० रुपयांनी दर वाढले होते. आकडेवारी पाहता फेब्रुवारीमध्येच एलपीजी गॅसच्या किंमती जवळपास १०० रुपयांनी वाढल्या. तर, डिसेंबर महिन्यात वाढलेले दर पकडल्यास दोन महिन्यांत साधारण २०० रुपयांनी एलपीडी गॅस महाग झाला आहे.

दुसऱ्या बाजूने सोमवारी व्यावसायिक सिलिंडरच्या दरांतही ९० रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठलेली असतानाच एलपीजीच्या दरांमध्येही वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागली आहे.

सरकारवर टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एलपीजी सिलिंडरचे दर पुन्हा एकदा वाढले, जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय व्यवसाय बंद करा, चूल फुका आणि खोटी आश्वासनं ऐकून पोट भरा, असे ट्विट राहुल यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!