कोरोना बाधित डॉक्टरांसाठी स्वतंत्र निवासाची सोय करावी

५ डॉक्टरांना करोना, गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर (जीएआरडी) संघटनेची राज्य आरोग्य सचिवांकडे मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यातील करोना मृत्यूचं सत्र सुरूच आहे. शुक्रवारी आणखी १२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर नवे १,४२० बाधित रुग्ण सापडले. करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या राज्यातील आठ डॉक्टरांनाही करोनाची लागण झाली असून, इतर आठ जणांत लक्षणंही दिसून येत आहेत. त्यांचे करोना चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरलं आहे. याची दखल घेऊन सरकारने तत्काळ कोविडचा संसर्ग झालेल्या डॉक्टरांसाठी राहण्याची वेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी डॉक्टरांच्या गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर (जीएआरडी) या संघटनेने राज्य आरोग्य सचिवांकडे केली आहे.

हेही वाचाः राज्यावर कोरोनाचा विळखा आणखी घट्ट

कोरोना बाधित डॉक्टर्सच्या राहण्याची वेगळी सोय करा

ड्युटीवर असताना कोविड-१९ संसर्ग झालेल्या डॉक्टरांसाठी स्वतंत्र निवास सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने (जीएआरडी) शुक्रवारी राज्य सरकारला केलीये. या असोसिएशनमध्ये गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलशी (जीएमसीएच) संलग्न डॉक्टरांचा समावेश आहे. राज्य आरोग्य सचिवांशी बोलताना जीएचआरडीने म्हटलंय, की कोविड-१९ची दुसरी लाट ही भयंकर आहे. या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचं काम प्रचंड वाढलंय. दरम्यान, किमान पंधरा डॉक्टरांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून अजून किमान आठ डॉक्टरांमध्ये कोविडची लक्षणं आढळून आली आहेत. या डॉक्टर्सनी त्यांची कोरोना चाचणी केली असून आता रिपोर्टची प्रतिक्षा आहे.

हेही वाचाःसंकट काळात मोदी सरकारचा मोठा निर्णय

सामान्य हॉस्टेलमध्ये कोरोना बाधित डॉक्टर्सना ठेवणं धोक्याचं

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या या डॉक्टरांसाठी स्वतंत्र निवास सुविधा तातडीने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. कारण त्यांना इतर डॉक्टर्ससोबत सामान्य हॉस्टेलमध्ये ठेवणं धोक्याचं आहे. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या बहुतेक डॉक्टर्सकडे या क्षणी क्वारंटाइनसाठी दुसरं कोणतंही ठिकाण नाही. आरोग्य यंत्रणेकडे आवश्यक सेवा उपलब्ध आहेत याची खात्री करण्यासाठी इतके प्रयत्न केले जात असताना, या प्रणालीची धुरा लीलया पेलणाऱ्या डॉक्टरांकडे दुर्लक्ष केल्यास ते दुर्दैवी ठरेल. त्यामुळे राज्य सरकारने कोरोना बाधित डॉक्टर्सना वेगळी राहण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी, अशी विनंती जीएचआरडीने केलीये.

देशाची कोरोनाची आकडेवारी

देशात कोरोनाने धुमाकूळ घातलाय. कोरोनाची आकडेवारी रोज नवनवे उच्चांक गाठतेय. 24 एप्रिलच्या देशातील कोरोना आकडेवारीनुसार 146,254,008 कोरोनाचे सक्रिय रुग्ण सध्या देशात आहेत. तर आतापर्यंत 3,099,632 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तसंच कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 124,050,896 एवढी आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!