गांजा लागवड प्रस्तावाबाबत सरकारचा मोठा निर्णय, विरोधकांवर मुख्यमंत्री कडाडले

गांजा लागवडीच्या प्रस्तावाला विरोध होत असताना मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: सध्या राज्यात सरकारच्या गांजा लागवड प्रस्तावावर राजकीय वादळ सुरु आहे. औषधी वापरासाठी राज्यात गांजा लागवडीचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. या प्रस्तावावरुनच सरकारला विरोधी पक्षांनी टीकेचं लक्ष बनवलं असतानाच आता सरकारमधील मंत्री आमदारांनीच या प्रस्तावाला विरोध केलाय. मुख्यमंत्र्यांनी आता या प्रस्तावाबाबत महत्वाची माहिती देताना गांजा लागवड प्रस्तावाला सरकारने स्थगिती दिल्याची घोषणा केली आहे.

कोणाकडून आला होता प्रस्ताव?

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितल्याप्रमाणे, इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ इंटीग्रेटेड मेडीसीन्सने (आयआयआयएम) देशातील वेगवेगळ्या राज्यांना औषधी वापरासाठी गांजा लागवडीसाठीचा प्रस्ताव पाठवला होता. सरकारला प्रस्ताव आला याचा अर्थ त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असा होत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हा प्रस्ताव वेगवेगळ्या खात्यात पाठवला जातो. कायदा खात्यातही तो प्रस्ताव अभ्यासला जातो असं मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांवर मुख्यमंत्री कडाडले

गांजा लागवडीच्या प्रस्तावाबाबत गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाईंनी सरकारवर प्रखर शब्दात टीका केली होती. तसंच मंत्री मायकल लोबोंनीही गांजा लागवडीच्या प्रस्तावाला विरोध करताना कोणत्याही परिस्थितीत हा प्रस्ताव मंजूर करु देणार नसल्याचं सांगितलं होतं. या सर्व टीकेला उत्तर देताना, काही जणांना ‘शिता आदी मीठ खाण्याची’ सवय असते अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी प्रत्त्युत्तर दिलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!