केकमध्ये गांजाः आणखी एका ड्रग्स तस्कराला अटक

संशयिताकडून ११ एलएसडी बोल्ट जप्त

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी:  मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मालाड (पूर्व) – मुंबई येथील बेकरीवर छापा टाकून गांजा वापरून बनवलेले केक आणि बेकरी पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात एनसीबीने सचिन तुपे या तस्कराला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताकडून ११ एलएसडी बोल्ट जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचाः पचनशक्ती, डोळ्यांची नजर मजबूत होण्यासाठी नियमित करा ‘ही’ 5 साधीसोपी योगासने!

१२ रोजी मध्यरात्री टाकला छापा

मालाड(पूर्व) – मुंबई येथील एका बेकरीतून श्रीमंत लोकांना अमली पदार्थ तस्करी होत असल्याची माहिती गुप्तहेरांनी एनसीबीला दिली होती. त्यानुसार पथकाने बेकरीवर शनिवार १२ रोजी मध्यरात्री छापा टाकून बेकरी मालकीन ब्लेस्सीला डिसोझा.

हेही वाचाः भाजपविरोधात पवारांची मोर्चेबांधणी सुरू ; राजधानीत मुक्काम

११ एलएसडी बोल्ट जप्त

या महिलेसह एल्स्टन फर्नांडिस या गोमंतकीय भागीदाराला अटक केली होती. त्यावेळी पथकाने अटक त्याच्याकड़ून ८३० ग्रॅम खाद्य गांजाने बनवलेला ब्राऊनी केक आणि ३५ ग्रॅम गांजा जप्त केला. त्यानंतर पथकाने जगत चौरिसीया या अमली पदार्थ तस्कराला अटक करून त्याच्याकडून पथकाने १२५ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी पथकाने तिघां संशयिताविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू केली असता, यात आणखीन तस्कराचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. या माहितीनुसार, पथकाने सचिन तुपे या तस्कराला अटक करून त्याच्याकडून ११ एलएसडी बोल्ट जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात आढळले ५२,२५६ नवीन करोना रुग्ण

३० रोजी पर्यंत न्यायलयीन कोठडी

दरम्यान या प्रकरणात अटक केलेल्या गोमंतकीय एल्स्टन फर्नांडिस याच्यासह ब्लेस्सीला डिसोझा आणि जगत चौरिसीया या तिघांना मुंबई येथील शहर सत्र न्यायालयाने ३० रोजी पर्यंत न्यायलयीन कोठडी ठोठावली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!