CRIME | सांतिनेझ गोळीबार प्रकरणातील टोळीला अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: पिटर भाट–सांतिनेझ येथे शनिवार 30 मे रोजी मध्यरात्री मारहाण करून हवेत गोळीबार केल्या प्रकरणी पणजी पोलिसांनी गौतम अस्नोडकर (21- मेरशी), आकाश मुटवादी (20 – कामराभाट), राहूल जाधव (30 – कोल्हापूर) या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणातील तोफिक शेख (25) आणि कुणाल गायकवाड (22) या दोघांना पणजी पोलिसांनी शुक्रवारी पुण्याहून अटक केली होती.
हेही वाचाः VIRAL VIDEO | मोदीजी, आम्ही शिक्षणाची कुर्बानी द्यायला तयार आहोत
तीन पिस्तूले, काडतूस आणि एक बलेनो कार जप्त
टोळीला अटक करण्यासोबतच या प्रकरणात गोळीबार करण्यासाठी वापरलेली तीन पिस्तूलेही पणजी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. तीन पिस्तूलांसोबत काडतूस आणि एक बलेनो कारही पणजी पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. शनिवारी पणजी पोलिसांनी या टोळीचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलंय.
हेही वाचाः मानव-वन्य प्राण्यामधला संघर्ष टाळण्यासाठी 100 नव्या जलसाठ्यांची निर्मिती
काय आहे प्रकरण?
पिटर भाट येथील दर्शन राजपूत यांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार, शनिवार 29 मे रोजी मध्यरात्री संशयित गौतम अस्नोडकर यांनी त्याच्या दोन साथीदाराने शुल्लक कारणावरून मारहाण केल्याचं म्हटलं आहे. तसंच संशयित गौतम याने हवेत गोळीबार करून पळ काढल्याचंही तक्रारीतही म्हटलं होतं. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी संशयित गौतम अस्नोडकर, आकाश मुथवाडी आणि राहूल जाधव यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 504, 506, 427 आणि शस्त्र कायद्याचे कलम 3 व 27 नुसार गुन्हा दाखल करून दुसऱ्या दिवशी अटक केली होती.
हेही वाचाः 65 मच्छिमारांना मिळाली नुकसान भरपाई
मुख्य संशयिताचा जामीन फेटाळला
अटक केलेल्या संशयितांना पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान संशयितांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यातील न्यायालयाने मुख्य संशयित गौतम अस्नोडकर याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तर इतर दोघांना 10 हजार रुपये आणि पाच दिवस पोलिस स्थानकात हजेरीच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी अड. अनुप कुडतरकर यांनी बाजू मांडली.