रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत गजानन मराठेला विजेतेपद…

शुबन, अनीष, प्रचेत, अनुज यांनी क्रमाने उपविजेतेपद पटकावले

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : येथील विद्यावर्धक मंडळ क्रीडा अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत गजानन मराठे याने नऊ पैकी नऊ गुण मिळवून विजेतेपद मिळविले. ७.५ गुण मिळवून शुबन पाटील दुसरा तर अनीश नाईक तिसरा आला. प्रचेत मालवाणकर व अनुज पाटील यांनी क्रमाने चौथा व पाचवा क्रमांक पटकावला असुन यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
हेही वाचाःACCIDENT : आसगावात कारची विजेच्या खांबाला धडक…

शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडली स्पर्धा

स्पर्धेत एकूण ६५ बुद्धिबळपटूंनी भाग घेतला. डिचोली तालुका बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने घेण्यात आलेली स्पर्धा शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात झाली. बक्षीस वितरण सोहळ्यास नगरसेवक अनिकेत चणेकर, विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई खजिनदार राजेश धोंड, क्रीडा अकादमीचे व्यवस्थापक अभिजित तेली, संचालक प्रीतेश पेडणेकर, साधनसुविधा विभागाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, डिचोली बुद्धिबळ संघटनेचे सत्यवान हरमलकर स्पर्धा आर्बिटर नीलेश धारगळकर, प्राचार्य ऑलांडो मिनेझिस यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी आमोणकर यांनी केले.
हेही वाचाःकेरळमध्ये बसचा भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू, ३८ जखमी…

स्पर्धेतील वयोगटातील यशस्वी स्पर्धक

७ वर्षांखालील वयोगट: दियांक पेडणेकर, चेतन पेडणेकर, यथार्थ देसाई. ९ वर्षांखालील वयोगट: समृथी माळकर, साईप्रसाद माळकर, सार्थक ह्याम. ११ वर्षांखालील वयोगट: आदर्श नाईक, पियुष वेर्णेकर, आत्मजा परब गावकर. १३ वर्षांखालील वयोगट : शुभम माळकर, मंथन कवठणकर. १५ वर्षांखालील वयोगट: प्रतीक मालवणकर, दिवीज कवठणकर, प्रतीक भोवर. १७ वर्षांखालील वयोगट: शिवराम परब, पियुष पठाडे, संचिता नाईक गावकर. १९ वर्षांखालील वयोगट: अमेय किंजवाडकर, उमेश नाईक, प्रथमेश तिळवे. चैतन्य धुपकर, मकरंद जोग, सौम्या कळणेकर, पियुष मावळणकर आणि साची साटेलकर या शांतादुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना खास बक्षीसे देण्यात आली.
हेही वाचाःकेदारनाथ आणि यमुनोत्री तीर्थक्षेत्रांचे दरवाजे बंद करण्याची ‘घोषणा’, ही आहे ‘तारीख’…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!