G20 आरोग्य कार्य गटाची दुसरी बैठक गोव्यात संपन्न

G20 सदस्य देश, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांमधील 180 हून अधिक प्रतिनिधी आरोग्य कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीत सहभागी झाले.

ऋषभ | प्रतिनिधी

पणजी, 17 एप्रिल 2023 : दुसऱ्या जी20 आरोग्य कार्यगटाच्या बैठकीला आज गोव्यामध्ये सुरुवात झाली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी बीजभाषण केले आणि केंद्रीय पर्यटन आणि बंदरे आणि नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या बैठकीत विशेष मार्गदर्शन केले. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल(आरोग्य), केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि जी20 सदस्य देश, विशेष निमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संघटना, मंच आणि भागीदार या बैठकीला उपस्थित होते.

डॉ. भारती प्रवीण पवार

“भारताचे जी20 प्राधान्यक्रम उत्तरदायी, समावेशक, समानताकारक आणि प्रतिनिधित्व देणाऱ्या मंचाची निर्मिती करणाऱ्या सुधारित बहुपक्षवादावर भर देणारे आहेत, जे 21व्या शतकातील आव्हानांवर तोडगे काढण्यासाठी योग्य आहेत”: डॉ. भारती प्रवीण पवार

गेल्या एका वर्षात 1.4 दशलक्षहून अधिक आरोग्य क्षेत्राशी निगडीत पर्यटकांनी देशाला  भेट दिली, यामुळे देश आरोग्य क्षेत्राशी निगडीत पर्यटनामधील  अव्वल स्थानांपैकी एक बनला आहे, असे श्रीपाद नाईक यांनी आरोग्य आणि निरामय क्षेत्राशी निगडीत पर्यटनाला प्रोत्साहन  देण्यासाठी भारताची  प्रगती  अधोरेखित करताना सांगितले. जागतिक आरोग्यासाठी अधिक सर्वसमावेशक  आणि शाश्वत दृष्टिकोनासाठी  एकत्रितपणे योगदान देण्याचे आणि जागतिक आरोग्य व्यवस्थेच्या  विविध पैलूंवर अर्थपूर्ण चर्चा करण्याचे आवाहन त्यांनी प्रतिनिधींना केले.

महामारीचा धोका कमी करण्यासाठी,  “एक आरोग्य” दृष्टिकोनातून आरोग्य व्यवस्थेमध्ये भूतकाळापेक्षा अधिक  गुंतवणूक करण्याची गरज केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी अधोरेखित केली.लस आणि उपचारांची उपलब्धता सुनिश्चित करून कोविड-19   प्रतिबंध  आणि नियंत्रण करण्यासाठीच्या उपायोजना सुरु  ठेवण्यावर त्यांनी भर दिला.

श्रीपाद नाईक

“गेल्या एका वर्षात 14 लाख वैद्यकीय पर्यटकांनी भारताला भेट दिली आहे, ज्यामुळे वैद्यकीय पर्यटनासाठी भारत आघाडीच्या स्थानांपैकी एक बनला आहे” : श्रीपाद नाईक

महामारी आपत्कालीन सज्जता आणि प्रतिसाद या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत , मात्र सज्जता आणि प्रतिसादाच्या तुलनेत  प्रतिबंधासाठी सामान्यतः कमी वित्तपुरवठा केला जातो यावरही त्यांनी प्रकाश टाकला. या दिशेने देखरेख  ठेवणे, प्रयोगशाळा प्रणाली आणि सार्वजनिक आरोग्य कर्मचारी बळकटीकरण यावर लक्ष केंद्रित करणार्‍या महामारी निधीच्या  प्रस्तावाच्या पहिल्या आवाहनाचे भारताकडून स्वागत आहे , असे त्यांनी सांगितले.  लवचिक आणि बळकट  जागतिक आरोग्य व्यवस्था  तयार करण्यासाठी, जी 7, जागतिक बँक, महामारी निधी इत्यादी विविध बहुस्तरीय  मंचांअंतर्गत  विविध आरोग्य उपक्रमांना जोडण्यासाठी जी 20 सदस्य राष्ट्रांनी काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

औषध उत्पादन विभागाच्या सचिव एस अपर्णा, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक  डॉ. राजीव बहल तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल ,केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि जी 20 सदस्य देशांचे अन्य प्रतिनिधी, विशेष निमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संस्था, मंच आणि हितसंबंधितही  या बैठकीत उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!