सगळंच महागणार! पेट्रोल-डिझेलवरील वॅटमध्ये वाढ, थेट दरांवर परिणाम

पेट्रोल-डिझेल महागल्यानं सर्वच महागणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : एकेकाळी पेट्रोल-डिझेल स्वस्त म्हणून ज्या राज्याकडे पाहिलं जात होतं, त्या आपल्या गोव्यात आता पेट्रोल डिझेलच्या किंमती नवा रेकॉर्ड रचू लागल्यात. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इंधनदरवाढीचा फटका आता गोंयकारांनाही बसू लागलाय.

अर्थसंकल्पातून ज्याची भीती व्यक्त करण्यात आली होती, ती बाब अखेर आता खिसा कापायला सुरुवात करु लागली आहे. फक्त देशातच नव्हे तर आता राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर नवे रेकॉर्ड नोंदवत आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती महागल्यानं सगळ्याचं गोष्टी महागण्याची शक्यता आहे. राज्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर १ रुपया ३० पैशांनी वाढलेत. तर दुसरीकडे डिझेलच्या दरातही ६० पैशांची वाढ झाली आहे. इंधनावरील वॅट वाढवल्यानं राज्यात इंधनाच्या दरांवर वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. पेट्रोलवरील वॅट २७ टक्के तर डिझेलवरील वॅट आता २३ टक्क्यांवर पोहोचलंय. गेल्या काही दिवसांपासूनच राज्यातील इंधनाचे दर भडकू लागलेत.

आता राज्यातील पेट्रोलचे दर शंभरीवर पोहोचण्याची भीतीही व्यक्त केली आहे. तसं झालं तर पेट्रोल-डिझेलवर अंवलंबून असणाऱ्या सर्वच व्यवसायांना फटका बसून महागाई आणखी वाढेल, हे नक्की.

पाहा कसे वाढलेत दर –

राज्यात आजचे दर काय?

आता काय काय महागणार?

पेट्रोल-डिझेल महागल्यामुळे इंधनाशी संबंधित प्रत्येक गोष्ट महागणार आहे. सगळ्यात आधी प्रवास महागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भाजी-पालाही महागेल. दरम्यान, वाहतुकीशी संबंधित प्रत्येक गोष्टीवरही इंधनदरवाढीचा परिणाम जाणवण्याची दाट शक्यता आहे. कोरोना महामारीत आधीच आर्थिक संकटात असणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल महागल्यानं आणखी फटका बसणार आहे.

मुंबईत ९३!

दरम्यान महत्त्वाच्या शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर किती आहेत, त्यावरही एक नजर टाका.

पेट्रोलचे दर

दिल्ली : 86.65 रुपये प्रति लीटर
मुंबई : 93.20 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 88.01 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 89.13 रुपये प्रति लीटर
नोएडा : 85.91 रुपये प्रति लीटर

डिझेलचे दर

दिल्ली : 76.83 रुपये प्रति लीटर
मुंबई : 83.67 रुपये प्रति लीटर
कोलकाता : 80.41 रुपये प्रति लीटर
चेन्नई : 82.04 रुपये प्रति लीटर
नोएडा : 77.24 रुपये प्रति लीटर

तुमच्या मोबाईलवर तपासा तुमच्या शहरातील पेट्रोलचा दर

आपल्या मोबाईलमध्ये आरएसपी आणि आपला शहर कोड लिहा आणि 9224992249 या नंबरवर पाठवा. आपल्या मोबाईलवर पेट्रोल आणि डिझेलचे दर आपल्या शहरासह येतील. प्रत्येक शहरासाठी कोड वेगवेगळे असतात. तुमच्या शहराचा कोड आयओसी वेबसाईटवर मिळू शकेल. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात तर नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात.

हेही वाचा – पर्यटनाला उभारी देण्यासाठी केंद्राकडून गोव्याला विशेष पॅकेज?

मिंत्राचा लोगो ज्यांना आक्षेपार्ह वाटतोय, त्यांनी एकदा हे लोगोसुद्धा पाहायलाच हवेत…

घरगुती वाद सार्वजनिक करणाऱ्या धक्कादायक Videoनं गुंता वाढवला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!