आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करणाऱ्यांसाठी लसीकरण खुलं

9 जूनपासून परदेशी प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसंच खेळाडूंचं होणार लसीकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करणाऱ्यांसाठी लसीकरण खुलं करत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी ट्विट करत केलीये. बुधवार 9 जून पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थी, नोकरदार तसंच खेळाडूंसाठी ही लसीकरण मोहिम सुरू होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

हेही वाचाः CORONA UPDATE! खाजगी हॉस्पिटलात अजून 5 मृत्यू झाल्याचं उघड; तर 24 तासांत 473 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

18-45 वयोगटासाठी लसीकरण

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी तसंच खेळाडूंसाठी ही विशेष लसीकरण मोहिम सुरू करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. या मोहिमेत परदेशात शिक्षणाच्या निमित्ताने जाणारे विद्यार्थी, नोकरीनिमित्त जाणारे गोंयकार तसंच खेळाडूंना कोविड प्रतिबंधक लस घेता येणार आहे. 18-45 वयोगटासाठी वरील व्यक्ती भारत सरकारच्या कोविड नियमावलीनुसार या लसीकरण मोहिमेदरम्यान कोविड प्रतिबंधक लसीचे डोस घेऊ शकतात, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

लसीकरणासाठी येताना ही कायदपत्रे आवश्यक

लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी येताना वरील व्यक्तींनी काही कागदपत्रे सोबत आणणं आवश्यक आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाच्या उद्देशाने प्रवेश ऑफर किंवा संबंधित औपचारिक संप्रेषण सोबत आणणे बंधनकारक आहे. तर परदेशी नोकरीसाठी जाणाऱ्यांना परदेशात नोकरी स्वीकारल्याचं इंटरव्ह्यू कॉल लेटर किंवा ऑफर लेटर सोबत आणणं अपेक्षित आहे. तर खेळाडूंना टोकियो ऑलिंपिक खेळांमध्ये भाग घेण्यासाठी नामांकन लसीकरण केंद्रावर पुरावा म्हणून सादर करावे लागेल.

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली होती विनंती

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी तसंच खेळाडूंच्या त्वरित लसीकरणसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींना विनंती केली होती. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांची विनंती मान्य करून या व्यक्तींच्या लसीकरणासाठी सोमवारी परवानगी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!