ताज्या भाज्यांनी राजधानीतील भाजी बाजार फुलला

ग्राहकांनी केली गर्दी; कांद्याचे दर उतरले; तर फरसबी झाली महाग

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः सर्वसामान्य जनतेच्या ताटात कांदा, टॉमेटो आणि बटाटा या फळभाज्या दिसतात आणि त्या नसल्यास जेवणात रूची वाढत नाही. या फळभाज्या किमान गरजा भागविणाऱ्या आहेत. सध्या आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यातील विविध भाजी मार्केट खुली होत असल्याने गोंयकार घराबाहेर पडून भाजी खरेदी करताना दिसतायत.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 11 हजारांनी घट

विविध भाज्यांनी फुलला बाजार

राजधानीतील भाजी मार्केट सध्या विविध भाज्यांनी फुललेलं दिसतंय. विविध प्रकारच्या ताज्या भाज्या सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या भाज्या खरेदीकरण्साठी ग्राहकही मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतायत. कांदे, बटाटे, टोमॅटो, गाजर, वालपापडी, कोबी, कारली, दोगडी, वांगी, फ्लॉवर, ढबू मिरची, चिकटी, काकडी, बीट इ. भाज्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे.

कांद्याचे दर उतरले, तर फरसबीचे दर भीडले गगनाला

मागील दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे कांदा कुजला होता. त्यामुळे त्याचे दरही काही प्रमाणात चढे होते. मात्र आता कांद्याचे दर उतरलेत. सध्या पणजी मार्केटमध्ये कांदा 35 रुपये किलो प्रमाणे विकला जातोय. मात्र फरसबीने उच्चांक गाठलाय. फरसबी 100 रुपये किलो या दराने विकली जातेय.

हेही वाचाः मुलाला शाळेत ऍडमिशन नाही मिळालं, म्हणून चक्क मंत्रालयात बॉम्ब ठेवला?

इतर भाज्यांचे दर

पणजीतील भाजी मार्केटमध्ये सळ्यात भाज्यांचे दर हे 50 ते 60 रुपये किलोच्या घरात आहेत. बटाट – काकडी यांचे दर 30 रुपये प्रति किलो आहेत. तर गाजर – ढबू मिरची – हिरवी मिचरी – दोडगी यांची विक्री प्रति किलो 60 रुपयांनी केली जातेय. बीट – वांगी – कारली या भाज्यांसाठी प्रति किलो 40 रुपये मोजावे लागत आहेत. तसंच टोमॅटो – 25, कोबी – 20, चिकटी – 50, लसूण – 160, आले – 80 रुपये, तर लिंबू – 2 रुपये एक आणि फ्लॉवर 30 रुपये एक या दराने विकला जातोय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!