स्वातंत्र्य सैनिक औदुंबर शिंक्रे कालवश

अखिल भारतीय स्वांतत्र्य सैनिक संघ, गोवा शाखेचे जनरल सेक्रेटरी म्हणून पाहिलं काम. गोमंतक मराठी भाषा परिषद, फोंडा शाखेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षं होते कार्यरत.

शेखर नाईक | प्रतिनिधी

फोंडा : स्वातंत्र्य सैनिक औदुंबर शिंक्रे (Audumbar Shinkre) यांचं मंगळवारी रात्री मडगावातील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. बुधवारी सकाळी फोंडा येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

औदुंबर शिंक्रे हे काही दिवसांपासून वार्धक्यामुळे आजारी होते. त्यांच्यावर मडगाव इथं खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुगंधा, मुले बिपीन, विधान, बिरेन, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

क्रांतिदिनानिमित्त 2009 मध्ये दिल्ली येथे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनमध्ये त्यांचा सत्कार केला होता. 1987 मध्ये गोवा मुक्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त फोंडा नगरपालिकेतर्फे नेली आगीयार यांच्या हस्ते सन्मान, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्या हस्ते सत्कार केला होता.

शिंक्रे यांनी अखिल भारतीय स्वांतत्र्य सैनिक संघ गोवा शाखेचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं होतं. त्यांनी गोमंतक मराठी भाषा परिषद, फोंडा शाखेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षं काम पाहिलं. त्याचबरोबर अनेक संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!