६० टक्के कुटुंबांना आजपासून मोफत पाणी

मुख्यमंत्र्यांची घोषणा; ओटीएस योजनेला 2 महिन्यांची मुदतवाढ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: १६ हजार लीटरपर्यंत पाणी वापरणाऱ्या राज्यातील सुमारे ६० टक्के कुटुंबांना उद्यापासून मोफत पाणी मिळणार आहे. सरकारच्या या योजनेमुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी व्यक्त केला.

हेही वाचाः ऑगस्टमध्ये कोविडचे ५४ बळी; २,९०३ जणांना लागण

सोशल मीडियाद्वारे गोमंतकीय जनतेला केलं संबोधित

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सोशल मीडियाद्वारे गोमंतकीय जनतेला संबोधित केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपण १६ हजार लीटरपर्यंत कमी पाणी वापरणाऱ्या कुटुंबांना मोफत पाणी देण्याची हमी दिली होती. ती आजपासून सत्यात उतरत आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत करावी आणि सरकारला सहकार्य करावं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

ओटीएस योजनेला 2 महिन्यांची मुदतवाढ

दरम्यान, प्रलंबित पाणी बिलांसाठी सरकारने सुरू केलेली वन टाईम सेंटलमेंट (ओटीएस) योजनेला आणखी दोन महिन्यांनी मुदतवाढ देण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

हा व्हिडिओ पहाः RAPE | FATHER | स्वत:च्याच सहा वर्षीय मुलीवर अत्याचार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!