गुड न्यूज ! 15 मे पासून 18 ते 44 वर्षांसाठीचे लसीकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : शनिवारपासून 18 ते 45 वर्षांसाठीच्या लोकांसाठी लसीकरण सुरू केलं जाईल,अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलीए. राज्यातील सर्व 35 सरकारी केंद्रांमधून हे लसीकरण मोफत केलं जाईल,असंही ते म्हणालेत. या लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करणं गरजेचं असून केवळ नोंदणीकृत नागरीकांनाच लसीकरण मिळेल.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 32 हजार लसींचे डोस दाखल झालेत. उर्वरीत अडीच लाख लसी पुढील आठवड्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली. 1 मे रोजीपासून देशभरात 18 ते 44 वर्षांसाठीच्या लोकांना लसीकरण देण्याची मोहीम सुरू झालीए. गोवा सरकारने तशी घोषणा केली होती परंतु लसींचा पुरवठा होऊ न शकल्यामुळे ही मोहीम लांबली. दरम्यान, शनिवारी 15 मे रोजीपासून लसी देण्याचं काम सरकारकडून सुरू होणार असलं तरी अडीच लाख लसींचा पुरवठा नेमका कधी होतो, यावरून या मोहीमेचे सातत्य निश्चित होणार आहे.