‘आप’कडून मोफत रेशन वितरण

गोंयकार भुकेले राहणार नाहीत याची खात्री करण्यासाठी उचललं पाऊल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोव्यातील प्रत्येक घरात मोफत रेशन पॅकेटचं वितरण करण्याचं लक्ष्य घेऊन आम आदमी पक्षाने सोमवारी मोठ्या प्रमाणात कोविड मदत अभियान सुरू केलं. कोविड, लॉकडाउन आणि आर्थिक मंदी अशा अनेक संकटांमुळे गोंयकार कुटुंबांना मोठा त्रास झाला आहे, असं सांगताना राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी पक्षाने सामान्य जनतेला आर्थिक मदत मिळावी म्हणून अनेकदा आवाहन केलं, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने पक्षाने हे अभूतपूर्व पाऊल उचलल.

हेही वाचाः तो कधी ‘धोनी’ बनला, तर कधी ‘छिछोरे’

कोणताही गोंयकार भुकेला राहणार नाही

या अभूतपूर्व मोहिमेचा एक-कलमी अजेंडा हाच आहे की, कोणताही गोंयकार भुकेला राहणार नाही हे सुनिश्चित करणं. गेल्या दोन महिन्यांपासून कोविड मदत कार्य करताना, आम्ही सामान्य माणसाला होणाऱ्या वेदना पहिल्या आहेत. आमच्या गोंयकर बंधू-भगिनींना आधाराची गरज आहे आणि हा आधार देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असं म्हांबरे म्हणाले.

हेही वाचाः धारावीची करोनामुक्तीकडे वाटचाल

जे भाजप सरकार करू शकली नाही ते ‘आप’ करतेय

आम्ही भाजप सरकारला अनेक वेळा सामान्य जनतेला आर्थिक दिलासा द्यावा, असं आवाहन केलं. पण ते कर्णबधिरांच्या कानावर पडलंं नाही. सावंत सरकारने गोंयकारांची दुर्दशा समजून घ्यावी, याची आता वाट गोंयकरांना पाहता येणार नाही, त्यामुळे आम आदमी पार्टी आता जे भाजपा सरकार करू शकली नाही ते करतेय, असं म्हांबरे म्हणाले.

हेही वाचाः पेडणेचा स्वाभिमान ‘उत्तम कोटकर’

‘आप’च्या टीमकडून ग्रासरूट लेव्हलवर काम

हे अभियान केवळ 7504750475 या एका हेल्पलाइनवर सुरू नसून अभूतपूर्व प्रमाणात राबवलं जात आहे, कुणालाही वगळलं जाऊ नये यासाठी प्रत्येक गावात घरोघरी जाऊन ‘आप’ची टीम ग्रासरूट लेव्हलवर काम करत आहे. मोहिमेच्या प्रमाणामुळे आणि जटिलतेमुळे आज प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तीन मतदारसंघात पायलट प्रकल्प राबविण्यात आले. एकूण 40 व्हॅन यासाठी सेवेत आहेत आणि 1,000 हून अधिक कार्यकर्ते ग्राम प्रधान यांच्या समन्वयाने घरोघरी रेशन पुरवत आहेत. प्रत्येक पॅकमध्ये पीठ, कडधान्य, साखर, मीठ इत्यादी सारखा सुमारे 10 किलोचा कोरडा किराणा आहे, असं कॅप्टन वेंझी व्हिएगास म्हणाले.

हेही वाचाः सच्चा मराठी प्रेमी उत्तम कोटकर यांचे निधन

20 वाहनांना दाखवला हिरवा झेंडा

म्हांबरेंनी आज पहिल्या २० वाहनांना पणजीतील पक्षाच्या कार्यालयातून हिरवा झेंडा दाखविला. यावेळी त्यांच्यासह राज्य नेते अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो, अ‍ॅड. सुरेल तिळवे, कॅप्टन वेंझी व्हिएगास, शुभम शिवलकर, वाल्मीकि नाईक, मॅनुअल कार्डोजो, संदेश तेलेकर, श्रीपाद पेडणेकर आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!