डिचोलीत मोफत डोळे तपासणी शिबिर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करणार उद्घाटन

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः आरोग्य संचालनालयातर्फे दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 पर्यंत डिचोलीतीली हिराबाई झांट्ये सभागृहात मोफत डोळे तपासणी आणि चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

या शिबिराचं उद्घाटन मुखयमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणारेय. यावेळी स्थानिक आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणारेत.

विविध संस्थांच्या सहकार्यातून शिबिराचं आयोजन

या शिबिरात नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी केली जाईल. चष्मे ही दिले जातील. तसंच आवश्यकता असल्यास सर्जरी करण्यात येईल. शिबिरात डॉ. मेधा साळकर, डॉ. मधुकर आणि त्यांचे सहकारी नेत्र तपासणी करतील. या शिबिराचं आयोजन प्रसाद नेत्रालय उडीपी, कलर काँन आशिया प्रा. लि. गोवा, नेत्राज्योती चॅरिटेबल ट्रस्ट उडिपी, इसिलोर व्हिजन फाऊंडेशन बंगळुरू आणि दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था डिचोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलंय.

अधिक माहितीसाठी डॉ. साळकर 9011025053, डॉ. मधुकर 9844761421 किंवा श्री. गावकर 9168375030 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.