कोव्हिड-१९ रुग्णांसाठी विनामूल्य डी-डिमर आणि इंटरल्यूकिन ६ चाचण्या

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती; दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात चाचण्या होणार उपलब्ध

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोविड-१९ रुग्णांसाठी जीएमसी येथे डी-डिमर आणि इंटरल्यूकिन ६ चाचण्या विनामूल्य देणारं गोवा हे देशातील पहिलं राज्य आहे. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात लवकरच या चाचण्या उपलब्ध होणार असल्याचं आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जाहीर केलं.

कोविड-१९ रुग्णांसाठी मदतनीस ठरणाऱ्या चाचण्या

“या चाचण्या कोव्हिड-19 संबंधित सायटोकिन रुग्णाच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरतील आणि मृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर वैद्यकीय मदत मिळवून देण्यात मदत करतील,” असं राणे म्हणाले.

जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा स्थापन करणार

वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाधित व्यक्तींमध्ये विशिष्ट कोविड-१९ स्ट्रेन्स शोधणं कठीण जात आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी विश्वजित राणे यांनी राज्यात जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपकरणं खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!