चोपडे येथे बंगला विक्रीच्या बहाण्याने ५ कोटींची फसवणूक

पेडणे पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे: चोपडे आगरवाडा येथील निवासी प्रकल्पाच्या विक्रीच्या बहाण्याने सुमारे पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी रविवारी एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तब्बल ४.७९ कोटी रुपयांची फसवणूक

पेडणे पोलिसांनी दिले अधिक माहितीनुसार, गुन्हेगाराने शांतपणे नियोजन करत तब्बल ४.७९ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. दिल्ली येथील वन सिटी प्रमोटर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आशिष सिंग यांनी पेडणे पोलिसांत शनिवार, दि. २५ रोजी तक्रार दिली आहे. त्या तक्ररीच्या आधारे राहुल शर्मा (रा. दिल्ली), विशाल गर्ग (रा. उत्तर प्रदेश), हरीश अरोरा व अभिनव चंदला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.      

चारही संशयितांनी कंपनीशी करार

या प्रकरणातील चारही संशयितांनी कंपनीशी करार केला होता. बंगला देण्यास त्यांनी विलंब लावला. शिवाय त्यांनी सुरक्षारक्कम म्हणून घेतलेले पैसे देण्यासही टाळाटाळ केली. यामुळे तक्रारदार आशिष सिंग यांनी थेट पेडणे पोलिसांकडे तक्रार केली. त्या तक्रारीनुसार, पेडणे पोलिसांनी तपास करून संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस  उपनिरीक्षक विवेक हळर्णकर  करत आहेत.

हेही वाचा:अत्याचार करणाऱ्या बापाला जन्मठेप…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!