व्यवसायाच्या निमित्ताने लाखोंची फसवणूक…

पोलिसांकडून एफआयआर दाखल होत नसल्याचा आरोप

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भागीदारीने व्यवसाय करण्याच्या नावाखाली मूळ हैदराबाद व सध्या कळंगुट-गोवा येथे वास्तव्यास असलेल्या एका संशयित व्यक्तीने आपली सुमारे १२ लाखांची फसवणूक केली आहे, अशी तक्रार सुकूर-पर्वरी येथे राहत असलेल्या सुरजीत सन्याल उर्फ सुबोध रंजन सन्याल यांनी पर्वरी स्थानकात दाखल केलेली आहे. परंतु, पर्वरी पोलिसांनी अद्याप याबाबत एफआयआर दाखल केलेला नाही. याबाबत सन्याल यांनी शुक्रवारी ‘गोवन वार्ता’ शी बोलताना संशयिताने त्यांची कशाप्रकारे फसवणूक केली याची सविस्तर माहिती दिली.
हेही वाचा:सत्तरीत प्रस्थापितांना धक्के…

८० टन गव्हाची ऑर्डर असल्याने मोठा फायदा

गोव्यात व्यवसाय स्थापन करण्यासाठी आपल्याला परवान्यांची आवश्यकता होती. त्यासाठीची मदत घेण्याच्या निमित्ताने आपली माझी संशयिताशी ओळख झाली. त्यातून गाठीभेटी वाढल्या. त्यात त्याने हैदराबाद येथे आपली कंपनी तसेच काजूचा कारखाना असल्याचे मला सांगितले. पुढे वेलची व इतर मसाले कमी दराने इतर राज्यांतून गोव्यात आणून त्याची विक्री करण्याच्या व्यवसायात ६० हजार रुपये गुंतवण्यास मला सांगितले. त्यानुसार प्रथम मी या व्यवसायात ६० हजार रुपये गुंतवले. त्यानंतर काही दिवसांनी बाहेरून आठ रुपये किलो दराने गहू आणून त्याची गोव्यात जास्त दराने विक्री करण्याचा व्यवसाय करण्याबाबत त्याने माझ्याशी चर्चा केली. गोव्यात प्रत्येक आठवड्याला ८० टन गव्हाची ऑर्डर असल्याचे आणि यातून मोठा फायदा मिळवून देण्याचे लालच त्याने आपल्याला दाखवले. त्यामुळे १० मे रोजी मी त्याला पत्नीच्या नावावरील बँकेतील एफडी मोडून ८ लाख रुपये दिले होते. या आठ लाखांच्या बदल्यात हमी म्हणून त्याने मला चेकही दिला होता, असे सन्याल यांनी सांगितले.
हेही वाचा:वेळसांवमध्ये ‘गोंयकारांचो एकवोट’; चिखली, बोगमाळोत माविन समर्थक…

लाखो रुपये घेऊन संशयित झाला बेपत्ता

दरम्यान, माझ्याकडून लाखो रुपये घेतल्यानंतर काहीच दिवसांत तो संशयित बेपत्ता झाला. त्याने आपले फोन घेण्याचे बंद केले. केवळ मॅसेजवरच बोलत राहिला. प्रत्येकवेळी पैसे देण्याच्या तारखा त्याच्याकडून देण्यात आल्या. परंतु, तो आपल्याला फसवतच राहिला, असे ते म्हणाले. संशयित सध्या गोव्यातच असून, काहीच दिवसांपूर्वीच तो दिसला होता. त्याने ज्याप्रकारे माझी फसवणूक केली आहे, तशी फसवणूक इतरांची करू नये आणि सर्वांचे पैसे लाटून गोव्यातून पलायन करू नये यासाठीच मी पर्वरी पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. परंतु, पोलिसांनी अद्याप त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केलेला नाही, असेही सन्याल यांनी सांगितले.
हेही वाचा:गावाचा विकास हाच एकमेव ध्यास…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!