साडे आठ लाखांची फसवणूक

संशयितास सावंतवाडीतून अटक; म्हापसा पोलिसांची कारवाई

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः राजवाडा म्हापसा येथील इलेक्ट्रिक दुकानातील साडे आठ लाखांच्या साहित्य खरेदी करून देय रक्कम अदा न करता फसवणूक करण्यात आली. या फसवणूकीच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी संदेश सुरेश घाडी (कोलवाळ, मुळ सिंधुदुर्ग – महाराष्ट्र) यास सावंतवाडी येथून अटक केली.

हेही वाचाः भूमी अधिकारीणी विधेयकाला विरोध करणार

26 ऑगस्टची घटना

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरीची ही घटना 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2  दरम्यान घडली होती. संशयित संदेश घाडी हा फिर्यादी दुकानदार प्रकाश सिरवी (खोर्ली-म्हापसा) यांच्या राजवाडा येथील जयलक्ष्मी इलेक्ट्रिकल दुकानात ग्राहक बनून आला. संशयिताने दुकानातून इलेक्ट्रिक पंखे, केबल्स, स्वीच, सॉकेट्स, सीव्हीसी केसिंग व कॅपिंग, पाईप्स मिळून एकूण 8 लाख 55 हजार 787 रुपयांचे साहित्य खरेदी केलं.

म्हणून दुकानदाराने विश्वास ठेवला

 या साहित्याचे बिल पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनी मार्फत फेडलं जाईल, असं संशयिताने फिर्यादी दुकानदाराला सांगितलं. त्यामुळे दुकानदाराने संशयितावर विश्वास ठेवला आणि त्याला साहित्य नेण्यास परवानगी दिली. परंतु संशयिताने वरील साहित्य सदर कंपनीमध्ये न नेता स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी घरी नेलं आणि वरील खरेदीची किंमत फेडता फसवणूक केली.

हेही वाचाः राणेंकडून कोकण प्रांताला शाश्वत प्रगतीची अपेक्षा

संशयिताला सावंतवाडीतून अटक

याप्रकरणी तक्रार नोंद होताच म्हापसा पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विराज कोरगांवकर, शिर्पा अभिषेक कासार आणि अक्षय पाटील यांनी सावंतवाडी येथे संशयितास पकडलं आणि त्याला भादंसंच्या कलम 406 नुसार अटक केली. तसंच चोरीचा सर्वमाल जप्त केला.

 दरम्यान संशयितास येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

हा व्हिडिओ पहाः Accident | 7 months Data | अपघात वाढले, पण मृत्यू होण्याचं प्रमाण घटलं!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!