मुलानं बनवलं मुलीच्या नावे फेक फेसबुक अकाऊंट, लुटले 22 लाख

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : सोशल साईट्स वापरताना जरा सांभाळून राहा आणि सतर्कताही बाळगा. हे वारंवार सांगण्याची गरज एवढ्यासाठीच कारण पुन्हा एकदा एका तरुणाला तब्बल 22 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. मुलीच्या नावे एका मुलानंच फेक फेसबुक अकाऊंट तयार केलं. तरुणाला आपल्या जाळ्यात ओढलं आणि चक्क 22 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयीत तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
लग्नासाठी फेसबुक आणि वेबसाईटवरून स्वतःला मुलगी असल्याचे भासवून स्वप्नील नाईक या युवानं एकाला लुबाडलंय. एक दोन नव्हे तर तब्बल 22 लाख रुपयांचा गंडा एका युवकाला घालण्यात आल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी संशयीताला पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पुन्हा एकदा फेक अकाऊंट्सचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
फेक अकाऊंटपासून सावधान
गेल्या काही दिवसांत अनेकांचे फेसबूक अकाऊंट हॅकही होत आहेत. तर अनेकांच्या नावे फेक अकाऊंट तयार करुन पैशांची मागणी केली जात आहेत. त्यामुळे जर तुम्हाला अशाप्रकारे फेसबूकवरुन ओळखीच्या किंवा अनोळखी माणसाकडून पैशांबाबत विचारणा झाली, तर सतर्क राहा. व्यक्तिशः फोन करुन किंवा संपर्क करुन पडताळणी करुन घ्या. फसव्या आश्वासनांना बळी न पडता काळजी घेण्याचं आश्वासन गोवा पोलिसांच्या सायबर क्राईम विभागानं केलं आहे.