संशयित एडविन नूनीस विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल…

बनावट कोविड सर्टीफिकेट सादर प्रकरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : भाजप नेत्या सोनाली फोगट खून प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी टाळण्यासाठी करोना पॉझिटीव्ह असल्याचे बनावट आरटीपीसीआर सर्टीफीकेट संशयित एडविन नूनीस यांनी पोलिसांना सादर केले. या प्रकाराबद्दल हणजूण पोलिसांनी एडविन विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचाः१३ जणांना आमिष दाखवून ७.३२ लाख रुपयांचा गंडा…

एडविनचा जामीन रद्द करण्याची मागणी

फोगट मृत्यू प्रकरणाशी निगडीत ड्रग्ज प्रकरणी हणजूण पोलिसांनी एडविन नूनीस या कर्लिस क्लबच्या चालकाला अटक केली होती. ७ सप्टेंबर रोजी संशयित नूनीस याची म्हापसा अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्थ जामिनावर सुटका केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संशयितास पोलीस वारंवार पाचारण करत होते. पण संशयित पोलिसांच्या चौकशी आमंत्रणाला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे हणजूण पोलिसांनी एडविन याचा जामीन रद्द करावा, अशी मागणी न्यायालयात अर्जाद्वारे केली होती.
हेही वाचाःछत्रपती शिवाजी क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळातर्फे स्वच्छता मोहीम…

१५ दिवसांची सूट द्यावी, अशी मागणी

जामिन रद्दसाठी अर्ज सादर केल्याचे समजताच संशयित शुक्रवारी पोलीस स्थानकात दाखल झाला व त्याने आपण कोविड पॉझिटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर केले. तसेच आपल्याला पोलीस स्थानकात हजेरी न लावण्यापासून १५ दिवसांची सूट द्यावी, अशी मागणी त्याने केली. संशयिताला दिलेल्या त्या प्रमाणपत्राची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी डायग्नोस्टीक्स सेंटरमध्ये चौकशी केली. तेव्हा त्याला सेंटरमधून नेगेटीव्ह सर्टीफीकेट दिले असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचाःInterview | भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारा डेव्हलपमेंट फॉर्म्यूला…

४६८ व ४७१ कलमाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल

त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक तेजेशकुमार नाईक यांच्या थेट तक्रारीच्या आधारे संशयित एडविन याच्या विरुद्ध बनावट कोविड पॉझिटीव्ह सर्टीफीकेट सादर केल्याच्या आरोपाखाली भा. दं.सं.च्या ४६८ व ४७१ कलमाखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक धीरज देविदास करत आहेत. 
हेही वाचाःगोवन वार्ता लाईव्ह वेबसाईटच्या द्वितीय वर्ष पूर्तीनिमित्त…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!