पैसे उकळल्या प्रकरणी चार पोलिस निलंबित

वाहतुक पोलिस अधीक्षकांनी हा आदेश जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: शिकेरी येथे जोडप्याकडून पैसे उकळल्या प्रकरणी कळंगुट पोलिस उपनिरीक्षकसह तिघांना, तर ढवळी फार्मगुडी येथे ट्रक चालकांकडून पैसे घेतल्या प्रकरणी फोंडा वाहतुक पोलिस स्थानकाशी संलग्न सहाय्यक उपनिरीक्षक अशा चार पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

हेही वाचाः रंगनाथ परबांचे पेडणे वीज विभागासमोर धरणे आंदोलन

कळंगुट पोलिस उपनिरीक्षकसह तिघे निलंबित

गेल्या रविवारी शिकेरी येथे आग्वाद किल्ल्यावर काही जोडपी जमली होती. कर्फ्यू आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी सदर जोडप्यांवर कळंगुट पोलिसांच्या पोलिस रॉबर्ट जीपवरील पोलिसांनी कारवाई केली. या जोडप्यांकडून दंडही वसूल करण्यात आला.
पण त्यांचा मानसिक छळ करून त्यांच्याकडून 5 हजार रूपये उकळल्याचा प्रकार प्राथमिक चौकशीत उघडकीस आला. ही चौकशी पर्वरीचे पोलिस उपअधीक्षक अ‍ॅडवीन कुलासो यांनी केली. प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे उपनिरीक्षक जतीन पोतदार, हवालदार पांडुरंग सावंत आणि आयआरबी चालक कॉन्सटेबल निलेश साळगांवकर यांना निलंबीत करणारा आदेश पोलिस अधीक्षक शोबीत सक्सेना यांनी जारी केला आहे.

हेही वाचाः पेडणे पोलिसांनी स्कूटर-मोटरसायकल चोरांची टोळी पकडली

सहाय्यक उपनिरीक्षक निलंबित

दरम्यान ढवळी फार्मगुडी बायपास रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रक चालकांकडून पैसे उकळल्या प्रकरणी वाहतुक पोलिस विभागाचे सहाय्यक उपनिरीक्षक अजित गांवकर यांना निलंबित करण्यात आलं आहे. वाहतुक पोलिस अधीक्षकांनी हा आदेश जारी केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!