भयंकर! 24 तासांत 4 कोरोना बळी, 4 पैकी तिघांना फक्त कोरोनाची बाधा

गोव्यातही कोरोनाचा उद्रेक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा एकीकडे वाढतोय. तर दुसरीकडे राज्यातील कोरोना बळींची संख्याही डोकेदुखी वाढवणारीच असल्याचं मंगळवारी समोर आलंय. गेल्या २४ तासांत तब्बल ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे.

Corona 24 800X450

चारपैकी तिघांना फक्त कोरोनाची बाधा असल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे मृत्यू झालेल्यांचं वयही जास्त नसल्यानं चिंता वाढली आहे. मृत्यू झालेल्या चारपैकी तिघांचं वय हे ५०च्या आतलं असल्याची माहिती कळतेय.

एकीकडे राज्यात कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनं चिंता वाढवली आहे. दुसरीकडे आता कोरोना बळींचीही संख्या वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणेसमोरची चिंता वाढली आहे. दरम्यान, एकीकडे कोरोना रुग्णवाढीचा वेग वाढत असताना दुसरीकडे लसीकरणाचा वेगही कमी होत असल्याचं समोर आलंय. पाहुयात त्याच संदर्भातला सविस्तर रिपोर्ट

पाहा स्पेशल रिपोर्ट –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!