म्हारुदेव मंदिराजवळ फॉरच्युनरचा अपघात, थोडक्यात मोठा अनर्थ टळला

राज्यातील अपघाताचं सत्र सुरुच

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा : राज्यातील अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. उसगावला एका फॉर्च्युनर कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात कारचंही मोठं नुकसान झालंय.

ऊसगाव येथील एका मंदिराजवळ रविवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. फॉर्च्युनर कारच्या झालेल्या या अपघाताची तीव्रता प्रचंड होती. फॉर्च्युनर गाडीचा पुढचा भाग या अपघातात अक्षरशः चेपलाय. उसगाव इथल्या म्हारुदेव प्रसन्न मंदिराजवळ हा अपघात झाला. जीए 05 डी 8336 या नंबरच्या फॉर्च्युनर कारचा अपघात झाला. म्हारुदेव मंदिराजवळ असलेल्या पुजारी आणि त्याची पत्नी थोडक्यात या अपघातातून बचावली आहे. बोरी येथील ही कार असल्याची माहिती मिळतेय. भरधाव कारवरुन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती मिळतेय.

दीपा प्रभुदेसाई यांच्या मालकीची ही गाडी आहे. दरम्यान, या अपघातामुळे राज्यातील अपघातांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. थोडक्यात मोठा अनर्थ या अपघातात टळलाय. यात बोरीतील असलेला कारचालक जखमी झालाय. मात्र कोणतीही जीवितहानी या अपघातात झालेली नाही. मात्र कारचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. नेमकं या अपघाताचं कारण कळू शकलेलं नाहीये. एका तीव्र वळणावर म्हारुदेवाचं मंदिर आहे. फोंड्याहून उसगावच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर हा भीषण अपघात घडलाय. अपघातांची मालिका राज्यात सुरुच असल्याचं या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय.

गोव्यातील 2021 या वर्षातील पहिल्या सात महिन्यांत किती अपघात झाले, याची आकडेवारी समोर आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून आलंय. मात्र अपघात होण्याचं प्रमाण वाढल्यानं चिंता कायम आहे.

राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलै २०२१ या 7 महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.९३ टक्के म्हणजे १५२ अपघात वाढले. तर अपघाती मृत्यूत १०.६८ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षीयपेक्षा १४ मृत्यू कमी झाल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. यंदा या कालावधीत ७०.९४ टक्के ८३ दुचाकी चालक आणि मागे बसलेल्यांचे मृत्यू झाल्याची माहिती वाहतूक पोलिस विभागाच्या मासिक अहवालातून समोर आली आहे. राज्यात यंदा सात महिन्यात ११४ अपघातात एक किंवा जास्त जणांचा मुत्यू झालाय. त्यापैकी ७७ गंभीर अपघात, २२२ किरकोळ अपघात तर १,११७ अपघातात फक्त वाहनाचे नुकसान झालंय. तसेच वरील कालावधीच्या २०२० मध्ये १२६ अपघातात एक किंवा जास्त व्यक्तीचा मुत्यू झाला होता. तर ८३ गंभीर अपघात, २६० किरकोळ अपघात तर ९०९ अपघातात फक्त वाहनाचे नुकसान झाले होतं.जुलै, २०२१ पर्यंत गोव्यात १,५३० अपघात झालेत. यात ११७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०२० मध्ये १,३७८ अपघातात १३१ जणांचा मृत्यू झाला होता.

यंदा २०२1 मध्ये सर्वाधिक मृत्यू ७१ दुचाकी चालकांचे झाले आहेत. तर त्यानंतर १५ पादचारी, १२ दुचाकीच्या मागे बसलेले, १० चालक, ५ प्रवासी, ३ सायकलस्वार अशी अपघातांची नोंद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ९३ जण गंभीर तर ३५२ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर याच कालावधीत २०२० मध्ये ८१ दुचाकीचालक, २२ पादचारी, १० दुचाकीच्या मागे बसलेले, ०९ चालक, ४ प्रवाशी, एक सायकलस्वार तर ४ इतरांचा मृत्यू झाला होता. तर १२१ जण गंभीर तर ४०० जणांना किरकोळ दुखापत झाली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!