माजी आमदार विनायक नाईक यांचं निधन

कोरोनाचा संसर्ग झाल्याने जीएमसीत घेत होते उपचार; राजकीय क्षेत्रात चौफेर संचार असलेलं व्यक्तीमत्त्व

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः माजी आमदार विनायक नाईक या़ंचं सोमवारी निधन झालं. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात चौफेर संचार असलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. स्थानिक स्वराज्य संस्था बळकट व्हाव्यात यासाठी त्यांनी दिलेलं योगदान प्रेरणादायी आणि संस्मरणीय आहे.

हेही वाचाः 2020 मध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यू तरुणांचे

समाजकार्यात योगदान

पिर्णचे माजी सरपंच, थिवीचे माजी आमदार, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी कोषाध्यक्ष, पिर्ण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष, कोलवाळ येथील डॉ. आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, कळंगुटच्या विद्यानिकेतन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक, नाथ पै स्मृती शैक्षणिक संस्थेचे सचिव, कोलवाळच्या महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अशा विविध भुमिकांत वावरुन त्यांनी समाजकार्यात आपला ठसा उमटवलेला आहे. १९८९ मध्ये ते मगो पक्षाचे थिविचे आमदार होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे गेल्या आठवड्यात त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं होतं.

हेही वाचाः बीएसी बैठकीवर विरोधी पक्षनेते दिगंबर कामतांचा बहिष्कार

वाचन चळवळीत मोठं योगदान

वाचन चळवळीत त्यांचं फार मोठं योगदान होतं. गोमंतक बुक सर्विस म्हणून ते दुकान चालवत होते. वेगवेगळ्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन भरवीत, युवकांत वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी बरेच प्रयत्न करीत होते.

हेही वाचाः मुख्यमंत्री डॉक्टरचा कोट चढवतील?

सदानंद शेट तानावडेंनी वाहिली श्रद्धांजली

माजी आमदार विनायक नाईक या़ंचं आज निधन झालं. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे, असं म्हणत भाजपा गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी नाईकांच्या दुःखावर शोक व्यक्त केला आहे.

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामतांनी ट्विट करून वाहिली श्रद्धांजली

माजी आमदार विनायक नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली. गोमंतकातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात त्यांचं योगदान तसंच शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचं कार्य प्रेरणादायी आहे. ईश्वराने त्यांच्या आत्म्यास सद्गती द्यावी व त्यांच्या परिवाराला हा आघात सोसण्याचं धैर्य द्यावं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!