म्हापशाचे माजी नगरसेवक मार्टिन कारास्को यांचं निधन

गुरुवारी पहाटे बांबोळीतील जीएमसीत घेतला अखेरचा श्वास

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: गुरुवारी पहाटे करासवाडा-म्हापशातील माजी नगरसेवक तसंच सामाजिक कार्यकर्ता मार्टिन कारास्को यांचं निधन झालं. बांबोळी येथील जीएमसीत वयाच्या ४७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने म्हापशावर शोककळा पसरली आहे. समाजात ते नेहमची लोकांच्या मदतीसाठी पुढे असल्याने त्यांच्या अकाली निधनावर अनेकांनी दुःख व्यक्त केलंय.

हेही वाचाः एक मोदी आणि अर्धे अमित शहा…केवळ दीड माणसं चालवताहेत केंद्र सरकार !

सुस्वभावी मार्टिन कारास्को

सदैव हसतमुख असणारे तसंच सुस्वभावी म्हणून ओळखले जाणारे मार्टिन कारास्को हे सामाज कार्याच्या बाबतीत इतरांपेक्षा नेहमीच दोन पावलं पुढे असायचे. अडल्यानडल्या माणसाला मदतीचा हात देणं हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या याच स्वभावासाठी लोक त्यांचा आदर करायचे. सुरुवातीला सुमारे अठरा वर्षं परदेशात नोकरी करून गोव्यात परतल्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या काळात म्हापशातील लोकांशी सख्य जोडल्यानंतर ते पालिका निवडणुकीत विजयी झाले होते.

हेही वाचाः कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना थेट प्रवेश? आज सुनावणी

नगरसेवकपदी केलं काम

मार्टिन कारास्को यांनी २०१५ ते २०२० या काळात नगरसेवकपदी सेवा बजावली. परंतु यंदा २०२१च्या निवडणुकीत त्यांचा प्रभाग असुसूचित जमातीतील महिलांसाठी राखीव ठेवल्यानं त्यांनी स्वत:च्या पत्नीला निवडणुकीत उतरवून तिला निवडून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अलीकडेच भाजपपुरस्कृत गटातर्फे निवडून आलेल्या प्रभाग तीनच्या विद्यमान नगरसेविका बारबरा कारास्को या त्यांच्या पत्नी होत.

हेही वाचाः श्रीपादभाऊंना बंदरे, पर्यटन तर नारायण राणेंकडं सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग

स्ट्रोक आल्याने हॉस्पिटलात होते एडमिट

दोन दिवसांपूर्वी त्यांना स्ट्रोक आल्याने त्यांना म्हापसा येथील एका खासगी हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं  होतं; मात्र, तिथे त्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना तातडीने जीएमसीत नेण्यात आलं. तिथेच उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!