दोनशे ठिकाणी आज वन महोत्सव

वन खात्याचे मुख्य वन संरक्षक सौरभ यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : वन खात्याचा वार्षिकवनमहोत्सव कार्यक्रम साेमवारपासूनसुरू हाेत असून राज्यातील विविधशाळांत, पंचायत तसेच इतर सरकारीजागांमध्ये दोनशे ठिकाणी हा वन महोत्सव साजरा हाेणार आहे. राज्यातसुमारे महिनाभर हा महोत्सव चालणारअसून यावेळी विविध प्रजातीची झाडेलावली जाणार आहे, अशी माहिती वन खात्याचे मुख्य वन संरक्षक सौरभ यांनी दिली.

वन खात्यातर्फे प्रत्येक वर्षी वन महाेत्सव

वन खात्यातर्फे प्रत्येक वर्षी वन महाेत्सव साजरा केला जातो. यात राज्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा समावेश असतो. तसेच पंचायत पातळीवर वन महोत्सव केला जातो. वनखात्याच्या जागेत तसेच इतर सरकारी जागेमध्ये हा सार्वजनिक वन महाेत्सव असतो. यावर्षीचा वन महोत्सव सोमवारपासून सुरू हाेणार असून सदर महाेत्सव १ महिना असणार आहे. यात जांभूळ, आवळा, चिंच, निंबू, सीताफळ, चंदन, तसेच अनेक औषधी झाडांची राेपटी लावली जाणार आहेत. लोकांनाही वन खात्यातर्फे माेफत झाडे दिली जाणार असून त्यांनी या वन महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन वन खात्यातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा:सत्तरीतील सरपंच, पंच धास्तावले, ‘हे’ आहे कारण…

फळझाडांना जास्त प्राधान्य

काही वर्षांपूर्वी माेठ्या प्रमाणात अकाशिया सारखी झाडे लावण्यात आली होती. ही झाडे पर्यावरणाला हानिकारक असल्याने मागील काही वर्षांपासून वन खात्याने पारंपरिक फळझाडे लावण्यात जास्त भर दिला आहे. त्यामुळे प्रत्येक वन महाेत्सवामध्ये ही फळझाडे लावली जातात. यंदाही अशी पारंपरिक फळझाडे, औषधी झाडे या वन महाेत्सवात लावली जाणार आहे, अशी माहिती यावेळी वनाधिकाऱ्यांना दिली.

महिन्याभरात लाखो रोपट्यांची लागवड

झाडांचे तसेच पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळेमध्ये वन महाेत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी विद्यार्थ्यांना झाडांची राेपटे दिली जातात. या महिन्याभरात लाखाे रोपट्यांची लागवड हाेणार आहे. सोमवारी एका दिवसात राज्यात जवळपास २०० ठिकाणी हा वन महाेत्सव कार्यक्रम हाेणार आहे. अनेक पंचायत, नगरपालिकांमध्ये वन महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. यात राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी सहभागी हाेणार आहेत. लोकांनीही या वन महाेत्सवात सहभाग घेऊन माेठ्या प्रमाणात झाडांची लागवड करून ती जतन करावी, असे आवाहन वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.           

           

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!