पार्से ध्रुव स्पोर्ट्सतर्फे वनमहोत्सव साजरा

अनेक युवतींचा सहभाग

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पार्से येथील ध्रुव स्पोर्ट्स कल्चरल क्लबतर्फे जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वनमहोत्सव साजरा करण्यात आला. क्लबचे चेरमेन दीपक कलंगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात वनमहोत्सव साजरा करण्यात आला.

तरुणींचा सहभाग

या वनमहोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मोरजी, मांद्रे, पार्से, तुये, हरमल, पेडणे, वारखंड आणि कोरगाव या भागातील विषया कांबळी, दिशा कांबळी, तृप्ती परब, उलीन्दा फर्नांडीस, शेफाली राऊळ, गृपाली साटेलकर, श्रुती शेटगावकर, प्रतीक्षा गावडे, रसिका नानोस्कर, पूजा वेंगुर्लेकर, रश्मी शेट्ये, रीमा आसोलकर, काशी सावळ देसाई, शामली सावंत, अर्पिता सावंत, श्रद्धा आरोंदेकर, सायीशा शेटगावकर, अमिषा शेटगावकर, निकिता तुळसकर, नेहा मालवणकर, मिलन सावळ देसाई, सलोनी राऊळ, सितारा मांद्रेकर या युवतींनी या वनमहोत्सवात सहभाग दर्शवून ठिकठिकाणी वृक्षारोपण केलं.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वन चरी,’

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वन चरी,’ ‘झाडे लावा जीवन जगवा’ हा संदेश सनातन काळापासून चालू आहे. झाडे जगली तरच मनुष्य प्राणी, जीव जंतू या धर्तीवर आनंदाने जगू शकतील. सर्वत्र विकासाच्या नावावर वृक्षांची कत्तल करून मोठाल्या इमारती उभारल्या जातायत. त्यामुळे शुद्ध हवा घेताना श्वास लागतोय. प्रदूषणामुळे सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. झाडे नाही तर प्राणवायू मिळणार नाही. त्यामुळे मोठी झाडं लावा प्राणवायू मिळावा हा संदेश या वनमहोत्सवाच्या निमित्ताने देण्यात आला.

झाडे का लावावीत?

झाडे लावली तर निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखून मनुष्याला सुखी जीवन जगता येईल. त्यासाठी झाडं लावणं महत्त्वाचं आहे. प्राणवायू मिळेल, पाऊस पडेल, पक्षांचा किलबिलाट ऐकू येईल, झाडावर वृक्षवेली बहरतील म्हणून झाडं महत्त्वाची आहेत.  झाडं केवळ मनुष्याला फळं देत नाहीत, तर जीवनाचा आधार ठरतात.

ध्रुव वनमहोत्सव 2021

पार्से येथील किडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ध्रुव स्पोर्ट्स क्लबने यंदा पर्यावरणाचं जतन आणि हरित क्रांती घडवण्याच्या दृष्टीने 2018 ध्रुव वनमहोत्सव साजरा करण्याचं जाहीर करून पूर्ण पेडणे तालुक्यात फळ-फूल झाडं लावण्याचा संकल्प करून आपली सामाजिक बांधिलकी जपण्याची प्रतिज्ञा केली. त्याचा शुभारंभ जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने करण्यात आला असल्याचं क्लबचे अध्यक्ष दीपक कलांगुटकर म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!