‘आप’कडून जीएमसीत अन्न वितरण मोहीम सुरूच

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः आम आदमी पक्षाने (आप) आपल्या कार्यकर्त्यांनी गेल्या पाच आठवड्यांत गोव्यातील तीन मोठ्या कोविड रुग्णालयात १७,००० हून अधिक अन्न पॅकेट्चं वितरण केल्याची माहिती दिली आहे. राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्फ्यू लागू झाल्यानंतर मोफत अन्न वितरण मोहीम सुरू झाली आणि चक्रीवादळ, पाऊस त्यानंतर वीज खंडती झालेल्या काळात कोणताही व्यत्यय न आणता दररोज ती सुरू ठेवली गेली.
हेही वाचाः पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवून मोदी सरकारने लुटले २२ लाख ७० हजार कोटी
राज्यातील 3 रुग्णालयात केलं अन्न वितरण
कर्फ्यू प्रतिबंधामुळे हॉटेल किंवा अन्न वितरण सेवा बंद असल्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना तीव्र त्रास झाला आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी तीन रुग्णालयांमध्ये, जिथे सर्वात जास्त रुग्णांना दाखल करण्यात आलं होतं, अशा ठिकाणी आपली सेवा प्रदान केली. यात म्हापशातील उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटल, मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटल आणि बांबोळीतील जीएमसीचा समावेश आहे, असं म्हंबरे म्हणाले.
हेही वाचाः पेडण्यातील शेतकऱ्यांना प्रवीण आर्लेकरकडून मदतीचा हात
रुग्णाच्या नातेवाईकांसोबत हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनाही दिलं अन्न
‘आप’चे कार्यकर्ते केवळ रूग्णाच्या नातेवाईकांनाच नव्हे, तर परिचारिका, रुग्णवाहिका चालक आणि स्वच्छता कर्मचार्यांनाही अन्न पॅकेट्स देत आहेत. जेव्हा रुग्ण संख्या नियंत्रणाबाहेर जात होती तेव्हा निर्माण झालेल्या अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आम्ही ही मदत पुरवली, ज्याचं अनेक डॉक्टरांनी कौतुक केलं, असं म्हांबरेंनी सांगितलं.
हेही वाचाः घृणास्पद । अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
सर्वांचे आभार
पहिल्या दिवसापासून आमचे सहकारी गोंयकारांची सेवा करण्यासाठी पुढे येत आहे, ज्याचा पक्षाला अभिमान आहे. अन्न वितरण मोहीम शक्य करून दाखवणासाठी मदत करणाऱ्या सर्व समर्थक तसंच हितचिंतकांचे आभार यावेळा म्हांबरेंनी मानले.