यशवंत-कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घ्या

मगोप नेते जित आरोलकरांचं विद्यार्थ्यांना आवाहन

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः इंटरेट नसतानाही कठीण प्रसंगी विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. या यशवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विकास साधावा. अशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी कोणत्याही अडचणी येऊ देणार नाही, अशी ग्वाही मगोप नेते जित आरोलकरांनी मांद्रे पंचायत सभागृहात दिली. पेडणे तालुक्यातील शालांत परीक्षेत पेडणे तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळवलेल्या नम्रता अशोक साळगावकर आणि अंशिका दशरथ बर्डे या विद्यार्थीनींचा गौरव सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मांद्रेचे सरपंच सुभाष आसोलकर, माजी सरपंच राघोबा गावडे, सेरोफिन फर्नांडिस, आम्रोज फर्नांडिस, पार्सेचे माजी सरपंच देवेंद्र प्रभू देसाई आदी उपस्थित होते.

हेही वाचाः ‘द सपोर्ट ग्रुप फॉर कोविड वॉरियर्स इन गोवा’ ट्रस्टतर्फे कोविड योद्ध्यांसाठी ८ रुग्णवाहिका

यशवंत विद्यार्थीनींचा गौरव

नम्रता अशोक साळगावकर आणि अंशिका दशरथ बर्डे या दोन्ही यशवंत विद्यार्थीनींचा आरोलकरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी या विद्यार्थीनींना रोख रक्कम तसंच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

हेही वाचाः काणका-पर्रा रस्त्यावरील बेकायदा दुकानवजा गाळ्यांवर कारवाई

विद्यार्थ्यांसोबत पालकांचं कौतुक

यशवंत विद्यार्थीनींनी गरिबीवर मात करत, कोणत्याच सोयी सुविधा नसताना, इंटरनेट सेवा नसताना शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. पेडणे तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला. त्याबद्दल दोघांचं अभिनंदन. तसंच या विद्यार्थीनींना ज्या पालकांनी घडवलं, त्यांच्याही कौतुक, अशा शब्दांत आलोकरांनी विद्यार्थीनींचं अभिनंदन केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!