पुरामुळे फोंडा तालुक्यात ४२६ घरांची हानी

२१ घरे पूर्णपणे जमीनदोस्त; उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा: कृषिप्रधान फोंडा तालुक्याला २३ जुलै रोजी आलेल्या महापुराचा मोठा फटका बसला असून तालुक्यातील सुमारे ४२६ घरांना या पुराचा फटका बसला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांनी दिली. या सर्व पूरग्रस्तांना तातडीने लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असंही ते म्हणाले.

हेही वाचाः विनावापर शाळांच्या वास्तू फोंडा तालुक्यात सर्वाधिक

उसगाव गांजे भागात सर्वाधिक नुकसान

गेल्या महिन्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता. यामुळे फोंडा तालुक्यातील नद्यांनी पातळी ओलांडून नदीकाठच्या गावांमध्ये प्रवेश केला होता. अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने रहिवाशांची प्रचंड धावपळ झाली होती. या पुरामुळे उसगाव गांजे भागात सर्वाधिक नुकसान झालं असून घरांसह शेती बागायतींचंही मोठं नुकसान झालं आहे, असं नाईक यांनी सांगितलं.

हेही वाचाः ३०० गरोदर महिलांनी घेतला कोविड लसीचा पहिला डोस

सरकारने आधी नुकसान भरपाईची रक्कम जाहीर करावी

मामलेदार, तलाठी आणि अन्य अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार, तालुक्यातील ४२६ घरं पुराच्या तडाख्यात सापडली. त्यातील २१ घरं पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. सुमारे ९५ घरं अर्धवट कोसळली असून, जवळपास ३१० घरं पाण्यात अर्धवट बुडाल्यानं प्रचंड नुकसान झालं आहे. शेती बागायतीचा नुकसानीचा आकडा पाहिल्यास नुकसान भरपाई देणं सरकारला शक्य होईल, असं वाटत नाही. त्यामुळे सरकारने आधी नुकसान भरपाईची रक्कम जाहीर करावी, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचाः सरकारी योजना आता घरबसल्या एका क्लिकवर

उसगाव-गांजेतील सुमारे २३१ घरे पाण्याखाली

पुराचा सर्वाधिक फटका उसगाव-गांजे भागाला बसला आहे. तेथील सुमारे २३१ घरे पाण्याखाली गेली आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मालमत्तेचे झालेले नुकसान पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी येत आहे. उसगाव-गांजे यासोबत मुरडी खांडेपार, वाघुर्मे, सावईवेरें, वळवई या भागांतही पुराने तांडव केलं. वेरें येथील सुप्रसिद्ध अनंत देवस्थान अर्धेअधिक पाण्यात बुडालं होतं.

हेही वाचाः करोनातून बरे झालेल्या ४१ नागरिकांचा मृत्यू

१९८२ नंतर प्रथमच अशी भीषण पूरस्थिती

१९८२ नंतर प्रथमच अशी भीषण पूरस्थिती तालुक्यात निर्माण झाली होती. आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. या पुरात शेती बागायतींचेही मोठं नुकसान झालं आहे. विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. या पुरात नुकसान आतोनात झालं आहे. मात्र, त्यासाठी कोणाला जबाबदार धरावं अन् कोणाकडे न्याय मागावा, अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे, असं मत गुरुदास शीलकर यांनी व्यक्त केलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | BHUMI ADHIKARINI | भूमी अधिकारिणीचं नाव बदलून चालणार नाही!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!