इंधन दरवाढीवर मंत्री गडकरीच देणार ‘स्वस्त’ पर्याय !

भारतात दाखल होणार फ्लेक्स इंजिन ; इथेनॉलवर चालणार वाहने

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : सतत वाढणा-या पेट्रोल व डिझेलच्या किमती ही आता कधीही न संपणारी समस्या बनलीय. मोर्चे, आंदोलनं आणि पुतळे जाळणं, हा यावर निश्चितच उपाय नाही. पेट्रोल-डिझेलला चांगला पर्याय शोधणं अत्यावश्यक होतं. यात गेल्या अनेक वर्षांपासून पुढाकार घेतलाय तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी. आजही इंडीयन बॅंकेच्या एका कार्यक्रमात त्यांनी याचा पुनरूच्चार केला. यासाठी फ्लेक्स इंजिन हा सध्या जगभरात मोठया प्रमाणावर वापरण्यात येणारा पर्याय आहे. भारतात येत्या तीन महिन्यात हे फ्लेक्स इंजिन दाखल होईल, अशी शक्यता आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती हा गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय मुद्दा बनलाय. याला पर्याय शोधण्याची नितांत गरज होती. भारतात विविध पातळीवर संशोधन होत असलं तरी सरकारमार्फत त्यावर अधिकृतरित्या काम होतं नव्हतं. असे काही नवे प्रयोग करण्याची सरकारची मुळात इच्छाशक्ती नसते, हेच परत परत दिसून आलं. मात्र नितीन गडकरी हे पहिल्यापासूनच अशा नवनवीन कल्पनांवर विचार करताहेत. त्याची अंमलबजावणी करताहेत. त्यांच्याच पुढाकारातुन ही नवी संकल्पना पुढं आलीय.

यात फ्लेक्स इंजिनचा नवा प्रकार वाहनांना वापरण्यात येईल. जगभरात सध्या ब्राझील, अमेरीका, कॅनडा यासारख्या देशांनी बीएमडब्ल्यू, मर्सिडिज, टोयोटा अशा कंपन्यांना फ्लेक्स इंजिन तयार करण्यास भाग पाडलंय. या इंजिनमध्ये इथेनाॅलचा वापर करता येवू शकेल. हे इथेनाॅल स्थानिक शेतीमालापासून तयार करता येतं. पेट्रोल जर 100 रूपयांना असेल तर इथेनाॅल आपल्याला 60 रूपयांपर्यंत मिळेल. शिवाय प्रदुषणही होणार नाही. येत्या दोन ते तीन महिन्यात भारतात हे इंजिन येईल, अशी शक्यता आहे. सध्या तरी इंधन दरवाढ आणि प्रदुषण यावर हाच एकमेव स्वस्त आणि किफायतशीर उपाय आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारांतुन तो देशवासियांना मिळणार आहे.

फ्लेक्स इंजिनसंदर्भात या व्हीडिओतून आपल्याला या एकूणच संकल्पनेची माहिती होण्यास मदत होईल…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!