नगरपालिका निवडणूक : 4 वाजेपर्यंत 63.16 टक्के मतदान

सांगे नगरपालिकेत सर्वाधिक 65.45 टक्के मतदान

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : म्हापसा, मडगाव, मुरगाव, सांगे आणि केपे या पाच नगरपालिकांसाठी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 63.16 टक्के मतदान झालं. सांगे नगरपालिकेत सर्वाधिक 79.13 टक्के मतदान झालं. शेवटचा तास बाकी असून मतदानाच्या टक्केवारीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

4 वाजेपर्यंत केपेत 74.88 टक्के, मडगावमध्ये 61.60 टक्के, म्हापशात 64.63 टक्के, तर मुरगावमध्ये 60.67 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानाचा शेवटचा तास कोरानाबाधित असलेल्या मतदारांसाठी राखीव ठेवण्यात आलाय. या काळात कोविडबाधित मतदान करू शकतील. त्यासाठी संबंधित मतदानकेंद्रांवर सर्व ती व्यवस्था करण्यात आली आहे.

2 वाजेपर्यंत 58.96 टक्के मतदान

सांगे नगरपालिकेत दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वाधिक 65.45 टक्के मतदान झालं. केपेत 58.96 टक्के, मडगावमध्ये 48.36 टक्के, म्हापशात 50.21 टक्के, तर मुरगावमध्ये 45.46 टक्के मतदानाची नोंद झाली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!