काँग्रेस पक्षात फितूरांना स्थान नाही

काँग्रेसचे केपेे गट काँग्रेस अध्यक्ष अवधूत आमोणकर यांचं वक्तव्य

Goan Varta Live | प्रतिनिधी

केपेः गोव्यात काँग्रेस पक्ष आज पूर्ण जोमाने काम करत आहे. भाजपला धडा शिकवणं तसंच भ्रष्ट, जातियवादी आणि असंवेदनशील भाजप सरकारची सत्ता स्थापन करण्यास मदत करणाऱ्यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे. आमच्या पक्षात फितूरांना स्थान नाही, असं काँग्रेसचे केपेे गट काँग्रेस अध्यक्ष अवधूत आमोणकर यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे फुटीर आमदार तथा विद्यमान उप-मुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांचे निकटवर्तीय अर्जुन वेळीप यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्यांवर स्पष्टीकरण देताना केपेे गट काँग्रेस अध्यक्षांनी काँग्रेस विरोधकांनी उठविलेल्या वावड्या असल्याचं सांगितलं.

केपेे गट काँग्रेसचे सर्व सदस्य लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी झटतायत

केपेे गट काँग्रेसचे सर्व सदस्य आज लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी झटत आहेत. आम्हाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि पाठिंबा पाहुन विरोधक धास्तावले आहेत. भाजप आणि त्यांचे सहकारी आता लोकांना खोटी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं आमोणकर म्हणाले.

केपे गट काँग्रेस करतंय नेटाने काम

केपे गट काँग्रेस आज नेटाने काम करत आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आमचं ध्येय आहे. आमचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत तसंच नवनियूक्त कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भक्कम पाठिंब्याने आम्ही पक्ष बांधणी करत आहोत, असं अवधूत आमोणकर यांनी म्हटलं आहे.

हा व्हिडिओ पहाः GANESH VISARJAN | गिरीत गणेश विसर्जन स्थळाचं उद्घाटन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!