सस्ती चिजों का शौक गोंयकारांना नाहीच! …पण म्हारग आसलें तरीय नुस्ते मात जाय

महाग असूनही मासळीला वाढती मागणी

नारायण गवस | प्रतिनिधी

पणजी : गोंयकारांचा आवडता आणि प्रचंड लोकप्रिय असणारा ताटातील पदार्थ म्हणजे मासे. आता पावसाळा असल्यामुळे माशांच्या किंमती चांगल्याच कडाडल्या आहेत. त्यातही मासेमारी हंगाम बंद असल्यानं आवकही घटली असली तरीही माशांची मागणी वाढलेलीच आहे.

मासेमारी हंगाम सध्या बंद असल्याने मासळीच्या किंमती आवाक्याबार गेल्याचं पाहायला मिळतंय. सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही अशा किंमतीमध्ये मासळी विकली जात आहे. समुद्री मासळीचे सध्या प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे आता लोक गोड्या मासळीवर ताव मारत आहे. बहुतेक लोक सध्या गाळ टाकून किंवा नदीवर चढणीच्या माशांवर ताव मारत आहे. काही ठिकाणी मानशीवरील गावठी कोळंबीही मोठ्या प्रमाणात सध्या खरेदी केली जात आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी काही मत्सविक्रेते गाळ टाकून धरलेले मासे विक्री करताना पहायला मिळत आहे. मासळी महाग असली तरी लोकांची मागणी मात्र वाढतच आहे.

हेही वाचा : VIDEO | अंगावर काटा आणणारा अपघात! गोंयकार कुटुंबाला एक्स्प्रेस वेवर कंटेनरने चिरडलं

माशांचा विरह सहन होईना!

गोव्यातील बहुतेक लोक हे मत्स्यप्रेमी आहेत. त्यामुळे लोकांना मासळी शिवाय राहता येत नाही. आता मासेमारी हंगाम बंद असल्याने ताजी मासळी मिळत नाहीये. तरी बर्फामध्ये ठेवलेली मासळी सध्या मेठ्या प्रमाणात मार्केटमध्ये विक्रीला आल्याचं पाहायला मिळतंय.या मासळींना मोठी मागणी असल्यानं त्याच्या किमतीही खूप महाग आहेत.

कुणाची किती किंमत?

सध्या सुरमई (ईसवण) तब्बल १ हजार रुपये किलोने विकली जातेय. मोठा पापलेट १ हजार रुपये किलो, चोणक ६०० रुपये किलो, मोठी कोळंबी ४०० ते ५०० रुपये किलो तर मोठे बांगडेही ३०० रुपये किलोने विकले जात आहेत. मुड्डुशे मासे ६०० रुपये किलोने विकले जात आहेत. तर तारले ३०० रुपये किलो असून बांगडे २०० रुपयांना ३ दिले जात आहेत. इतर लहान माशाचा वाटा १०० रुपयांना मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना या किमती परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे बहुतेक लोक सध्या गोड्या पाण्यातील गावठी मासळीवर ताव मारत आहे.

हेही वाचा : चापोली धरणात सापडला 25 किलोचा मासा !

चिकन मटणही तेजीत

मासळीप्रमाणे चिकन मटणालाही सध्या मागणी वाढली आहे. मटण ७०० रुपये किलोने विकले जात आहे. तर चिकन १४० रुपये किलोने विकले जात आहे. अंडी ७० रुपये डझनेने विकली जात आहे. सध्या पवसाळा असल्याने या शाखाहारी पदार्थानी मोठी मागणी असते. बहुतेक लोक ताजी मासळी मिळत नसल्याने सध्या अंडी चिकनावर ताव मारत आहे. म्हणूनच चिकनची मागणीही वाढलेली आहे.

हेही वाचा : Special Report | नुस्तें गायब जाले? माशांच्या किंमती गगनाला का भिडल्या?

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!