गोव्याच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या ‘बुल-ट्रॉलिंग’ला रोखण्यात मत्स्यव्यवसाय विभाग अपयशी

गोंयचो रापोणकराचो एकवोटचे अध्यक्ष आग्नेल रॉड्रिग्स यांचा आरोप

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः २०१७ मध्ये केंद्र सरकारने बुल ट्रॉलिंग आणि आयईझेड वापरावर बंदी घातली आहे. परंतु आजही गोव्यात सरकारने अशी उपकरणे वापरात ठेवली आहेत आणि बुल ट्रॉलिंगला रोखण्यात मत्स्यव्यवसाय विभाग अपयशी ठरला आहे, असा आरोप गोंयचो रापोणकराचो एकवोटचे अध्यक्ष आग्नेलो रॉड्रिग्स यांनी केला आहे.

… तर होणाऱ्या अप्रिय घटनेसाठी केवळ राज्य सरकार जबाबदार

रॉड्रिग्स यांचं म्हणणं आहे की २०१६ मध्ये मत्स्यव्यवसाय विभाग आणि २०१७ मध्ये केंद्र सरकारने प्रादेशिक पाण्यात बुल ट्रॉलिंग आणि इंडियन एक्सक्लुझिव्ह झोन (आयईझेड) च्या वापरावर बंदी घातली आहे. परंतु आजही शंभरहून अधिक कर्नाटकातील ट्रॉलर राज्याच्या समुद्रात येऊन मासेमारी करतात. गोवा सरकारची किंवा कायद्याची भीती न बाळगता या प्रतिबंधित विध्वंसक उपकरणे वापरणे त्यांनी सुरूच ठेवलं आहे. हे जर असंच चालू राहिलं, तर त्यामुळे होणाऱ्या कोणत्याही अप्रिय घटनेसाठी केवळ राज्य सरकार जबाबदार असेल.

कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या ट्रॉलर्सवर कठोर कारवाई करा

गोंयचो रापोणकाराचो एकवोटचे सरचिटणीस ओलेन्सियो सिमाॅईश म्हणाले, मालपे येथील बेकायदेशीर मासेमारी करणारे ट्रालर्स जप्त केले पाहिजेत आणि सर्व नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या ट्रॉलर्सच्या मालकांवर सर्व आवश्यक ती कठोर कारवाई सुरू केली पाहिजे. मत्स्यव्यवसाय मंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्ज यांनी मत्स्यव्यवसाय विभागाला ताबडतोब प्रतिबंधित करण्याचे आणियोग्य ती कारवाई करत कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. कारण जर असे प्रकार सुरू राहिले तर गोव्याच्या समुद्रातील मासे लुप्त होतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!