झुआरीनगरमध्ये अग्नितांडव, 35 लाखांचे नुकसान

हॉटेलसह पाच दुकानांना झळ

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को : झुआरीनगर येथे मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये वेलकम हॉटेलसह पाच दुकानांचे मोठे नुकसान झाले. या ठिकाणी उभी करण्यात आलेली दोन दुचाकी वाहने या आगीमध्ये भस्मसात झाली. त्यामुळे सुमारे तीस पस्तीस लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. वेर्णा अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाने अठरा लाखाची मालमत्ता आगीपासून वाचविली.

मध्यरात्री आगीचे रौद्ररुप

झुआरीनगरच्या रस्त्याकडेला वेलकम हॉटेल व इतर पाच दुकाने एकमेकांना लागून आहेत. या दुकानांना मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागल्याचे दिसल्यावर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. वेलकम हॉटेलाचे मालकाला या आगीचे माहिती मिळताच ते तातडीन तेथे पोहचले. या दरम्यान आगीचा भडका उडून हॉटेल व दुकाने पूर्णपणे जळाल्याचे दिसून आले.

…तर नुकसान टळले असते!

अग्निशमन दल वेळेवर आले असते, तर सदर नुकसान टाळता आले असते, असे हॉटेलाचे मालक विनोदकुमार गोपीनाथ यांनी सांगितले. स्थानिक पंच कविता कमल यांनही अग्निशमन दल उशिरा आल्याचा दावा केला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने आग इतरत्र पसरली नाही. येथे बरीच दुकाने व घरे एकमेकांना खेटून आहेत.त्यामुळे आग इतरत्र पसरण्याची शक्यता होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!