Fire | Video | पिसुर्लेजवळ ट्रान्सफॉर्मला आग, पण वीज कर्मचारी नॉट रिचेबल

फोन करुनही काहीही उपयोग झाला नाही!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : पिसुर्ले इथं पंचायतीजवळचा टान्सफार्मर जळून खाक झाला. त्यामुळं पिसुर्लेसह परिसरातील गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. यासंदर्भात वीज खात्याच्या कार्यालयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणीच फोन घेत नसल्यानं नागरीक संतप्त झालेत.

कशामुळे आग लागली?

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली ते अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. बुधवारी सकाळच्या सुमारात पिसुर्ले पंचायतीजवळच्या ट्रान्सफॉर्मला आग लागल्याचं काही स्थानिकांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती वीज खात्याला देण्यासाठी फोनही केला. मात्र वीज खात्यातील कार्यालयाकडून कुणीच फोन घेतला नाही. त्यामुळे स्थानिकांचीही निराशा झाली.

हेही पाहा : FIRE | फोंड्यात घराला आग लागून नुकसान

या सगळ्यात ट्रान्सफॉर्मर जळून खाक झालाय. ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाल्यामुळे या भागातील वीज पुरवठाही खंडित झालाय. त्यामुळे स्थानिकांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. सुदैवानं ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.. दरम्यान, आता वीजपुरवठा केव्हा सुरळीत होतो, याकडे पिसुर्लेतील लोकांचं लक्ष लागलंय.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा : गोवन वार्ता LIVEच्या बातमीचा दणका!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!