चिंचणीत अग्नितांडव! तब्बल 7 गाड्या जळून खाक

आग आटोक्यात, सुदैवानं जीवितहानी नाही

अजय लाड | प्रतिनिधी

मडगाव : काही दिवसांपूर्वी कोलवा सर्कलजवळ बीएमडब्लू कार भररस्त्यात जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच आता चिंचणी येथील आगीत ७ गाड्या जळून खाक झाल्याचं समोर आलंय. चिंचणीतील एसकेबी ऑटो वर्क्स या गॅरेजबाहेरील गाड्यांना आग लागण्याची घटना रविवारी पहाटे घडली. या घटनेत सात गाड्या पूर्णत: जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाने आग विझवल्याने मोठा अनर्थ टळलाय. तसंत आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात टळलंय. या घटनेत सहा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली.

थोडक्यात अनर्थ टळला

चिंचणी दांडेवाडा येथील एस. के. बी. ऑटो वर्क्सच्या बाहेरील जागेत ठेवण्यात आलेल्या गाड्यांना आग लागण्याची घटना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. गॅरेजच्या नजीक राहणा-या मेकॅनिकने अग्निशामक दलाला याबाबतची खबर दिल्यानंतर अग्निशामक
दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाकडून गाड्यांवर फोमयुक्त पाण्याचा मारा करत आग नियंत्रणात आणण्यात आली. सुमारे अर्धा ते पाउन तास आग विझवण्याचे काम सुरू होते व यासाठी एक गाडी पाण्याचा वापर करण्यात आला.

हेही वाचा – Video | CCTV | रेल्वे लाईन क्रॉस करतानाच गाडी अडकली, रेल्वेनं चिरडलं!

६ लाखांचं नुकसान, ३० लाखांचं सामान वाचवण्यात यश

गॅरेजबाहेर उभ्या करुन ठेवण्यात आलेल्या सात गाड्या या आगीत जळून खाक झाल्याने सुमारे सहा लाखांचे नुकसान झालेले आहे. अग्निशामक दलाकडून आग विझवण्यात आल्याने गॅरेजच्या आतील बाजूला असलेल्या गाड्या सुरक्षित राहिल्या. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार ३० लाखांचा मुददेमाल वाचवण्यात यश आलेले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान सतिश साळुंखे, अल्पेश नाईक, सुशांत नेतार्डेकर, प्रभाकर वेळीप, पांडुरंग गावकर यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा – Crime | मास्कवरुन राडा! सुपरमार्केटमधील CCTV समोर

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!