कांदोळी समुद्रकिनारी दोन शॅक रेस्टॉरंटना आग

लाखो रुपयांची हानी ; एक जण किरकोळ जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : कांदोळी बीचवरील दोन शॅकला आज दुपारी अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. आगीत लाखो रुपयांची हानी झाली आहे. तर फुटलेल्या गॅस सिलिंडरचा तुकडा लागून एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
हेही वाचाःअपघातातील मृत चालकाची ओळख पटली

लाखो रुपयांची हानी

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी वाडी-कांदोळीतीली समुद्रकिनाऱ्यावरील दोन शॅक रेस्टॉरंटना अचानक लागल्याने आगीमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. ही आग दुपारी लागली. दुपारी जेवणासाठी लोक शॅक-रेस्टॉरंटमध्ये बसले असता रेस्टॉरंटमधून आगीचे लोळ बाहेर येत असल्याचं दिसून आलं. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी लगेच पाण्याच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यावर उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती शॅक रेस्टॉरंटचे मालक हरि बागकर आणि सांतान फर्नांडिस यांना दिली असता त्यांनी अग्निशामक दलाला याविषयी माहिती दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घनास्थळी दाखल होत आगीशी झुंज देत ही आग विझविण्यात यश मिळवलं. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं असून फुटलेल्या गॅस सिलिंडरचा तुकडा लागून एकजण किरकोळ जखमी झालाय. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.
हेही वाचाःघरघर चलो अभियानास पार्सेकरांना भरघोस प्रतिसाद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!