मिलिंद सोमणविरुद्ध एफआयआर

नग्न फोटोप्रकरणी कोलवा पोलिसांनी दाखल केला एफआयआर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्यातील बीचवर नग्न अवस्थेत धावतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमणच्या अडचणी वाढल्यात. कोलवा पोलिसांनी मिलिंद सोमणविरुद्ध एफआयआर दाखल केला असून तपासाला सुरुवात केलीय.

मॉडेल पूनम पांडेच्या अश्लील व्हिडिओचा विषय ताजा असतानाच अभिनेता मिलिंद सोमणचा नग्न फोटोही वादात सापडला होता. मिलिंद सोमणने स्वत: गोव्यातील एका बिचवर नग्नावस्थेत धावतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या संदर्भात सोमणवर कारवाई करावी, अशी तक्रार गोवा सुरक्षा मंचकडून पोलिसांत करण्यात आली होती.

गोवा सुरक्षा मंचाकडून वास्को पोलिसांत सोमण यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. गोव्यातील एका बिचवर नग्न अवस्थेत धावत असल्याचा फोटो मिलिंद सोमण यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यावरून वादंग सुरू आहे. गोव्यात हा फोटो व्हायरल झाल्यानंतर गरमागरम प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या. गोवा सुरक्षा मंचानं याची दखल घेउन वास्को पोलिस स्थानकात सोमणविरुद्ध तक्रार दाखल केली.

गोव्याची बदनामी सहन करणार नाही

या संदर्भात आरएसएसच्या गोवा प्रांताचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. या नटनट्या गोव्यातच येउन असले उद्योग का करतात? हे प्रकार थांबले पाहिजेत. पोलिसांनी अशा स्वैर वागण्यावर नियंत्रण ठेवायला हवं. अशा प्रकारांमुळे गोव्याची प्रतिमा खराब होते. गोवा हे वर्ल्ड टुरिझम डेस्टिनेशन आहे. त्यामुळे असे प्रकार घडल्यानंतर जागतिक पातळीवर गोव्याची प्रतिमा डागाळली जाते. अशा प्रकारांना गोमंतकीयांनी मुळीच खपवून घेता नये, असे वेलिंगकर म्हणाले.

पहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!